Download App

Bigg Boss Marathi: घरात ‘ड्रामाक्वीन’ची एन्ट्री; आता घरात ‘ड्रामाक्वीन’च्या स्टाईलने होणार ठणाणा

Bigg Boss Marathi Season 5 Day 63 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवा सीझन पहिल्या (Bigg Boss Marathi) दिवसापासूनच चर्चेत आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Day 63 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवा सीझन पहिल्या (Bigg Boss Marathi) दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत आणि गायकांपासून सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्स सामील झाले आहेत. (Bigg Boss Marathi Season 5) त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत. आता या सदस्यांना भेटायला त्यांना खास सल्ले द्यायला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक खास पाहुणी येणार आहे. ड्रामाक्वीन राखी सावंतची (Rakhi Sawant) ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री होणार आहे.


‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की,”राखी सावंतने हॅलो बिग बॉस म्हणत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसला राखी म्हणतेय,”मी राखी सावंत तुमची पहिली बायको”. त्यानंतर निक्कीला राखी म्हणतेय,”सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार माझंच ठणाणा…निक्की तांबोळी सोडून येणार तुला अंबोली”.

राखीला पाहताच निक्कीचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. निक्की बोलण्यात कोणाला ऐकत नाही. त्यामुळे आता राखी सावंतला ती कसं गप्प करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंत आज तिच्या स्टाईलने जबरदस्त कल्ला करताना दिसणार आहे.

Bigg Boss Marathi: मुंबईत कधीही पाऊल न ठेवलेल्या अंकिताच्या बाबांची एन्ट्री; कोकणहार्टेड गर्लला अश्रू अनावर

सूरजला मिळणार सुखद धक्का

‘बिग बॉस मराठी’च्या नवा प्रोमो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”सूरज स्वागत करुयात आपल्या बहिणींचं आणि आत्यांचं”. सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहेत,”तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे. सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

follow us