Download App

Elvish Yadav: मोठी बातमी! एल्विश यादव प्रकरणाचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर

Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी विजेताृ एल्विश यादव (Bigg Boss OTT Winner Elvish Yadav Winner)
वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये (Noida Rave Party Case) सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर 6 जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव (Elvish Yadav) त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते. आता या प्रकरणाचा धक्कादायक वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालात मोठी माहिती समोर आली.


वनविभागातर्फे सापांची वैद्यकीय तपासनी करण्यात आली आहे. या तपासामध्ये 5 कोबरा विषारी असल्याचे तर 4 साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे. डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय प्रशिक्षण करण्यात आलं आहे. विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे गुन्हेगाराला 7 वर्षापर्यंतची शिक्षा भोगावी लागणार आहे. आता न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. 25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असतो. तो नेहमी शॉर्ट फिल्म्स देखील बनवत असतो. ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवड आहे.

Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?

बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व 17 जून 2023 दिवशी सुरू झालं होतं. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सहभागी झाल्याचे बघायला मिळाले होते.

Tags

follow us