बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav वर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण

बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav वर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण

Elvish Yadav FIR Filed : बिग बॉस ओटीटी विजेता <strong>एल्विश यादव (Elvish Yadav) वर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर रेव्ह पार्टीमध्ये सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या व्यक्तीने एल्विशसह इतर सहा जणांवर हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एल्विश यादव त्याच्या काही सहकाऱ्यांसह रेव पार्टी करत होते.

दिल्लीपासून मुंबईपर्यंतचा श्वास गुदमरला; ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच का बनते गॅस चेंबर?

तसेच या पार्टीमध्ये बंदी घालण्यात आलेल्या सापांचं विष देखील वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या पार्टीमध्ये परदेशी मुलींना देखील आमंत्रित करण्यात येत होतं. असं देखील या एफाआयआरमध्ये म्हटलं आहे. दरम्यान या प्ररकरणी पाच जणांना ताब्यात देखील घेतलं गेलं आहे. तसेच पोलिसांकडून एल्विशचा देखील चौकशी केली जात आहे.

Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनने ‘या’ चित्रपटातून ठेवलं पार्श्वगायनात पाऊलं

दरम्यान गौरव गुप्ता यांच्या पीपल फॉर अॅनिमल या संस्थेने एल्विश यादवसह त्याच्या सहकाऱ्यांवर सापांचे व्हिडीओ देखील काढल्याचा आरोप केला गेला आहे. पोलिस याच सापांच्या संदर्भात कारवाई करत असताना त्याचा संदर्भ एल्विश यादवपर्यंत पोहचले आहे. एल्विश यादव ने बिग बॉस ओटीटी 2 या शोमध्ये वाईल्ड कार्डच्या द्वारे प्रवेश केला होता.

मात्र त्यानंतर तो थेट विजेत्याच्या किताबापर्यंत पोहचला. दरम्यान नुकतच काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं होतं. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube