Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनने ‘या’ चित्रपटातून ठेवलं पार्श्वगायनात पाऊलं

Bigg Boss 16 चा विजेता एमसी स्टॅनने ‘या’ चित्रपटातून ठेवलं पार्श्वगायनात पाऊलं

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या 16 (Bigg Boss 16) व्या सिजनचा विजेता गायक आणि रॅपर एमसी स्टॅनने ‘फर्रे’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पाऊलं ठेवलं आहे. त्याने त्याच्या सोशल मिडीयावर या संदर्भात माहिती दिली आहे. ‘फर्रे’ या चित्रपटातून अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीची बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

तर एमसी स्टॅनने या चित्रपटाचं शीर्षगीत गायलं आहे. याबद्दल एमसी स्टॅनने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, दमदार काम अलिजेह,सलमान खानच्या चित्रपटासाठी पार्श्वगायन करत मी या क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Maratha Reservation : फडणवीसांचे नियोजन, CM शिंदेंचे प्रयत्न अन् जरांगेंनी साधलेले टायमिंग

‘फर्रे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुलतान जामतारा फेम सौमेंद्र पाधी यांनी केलं आहे. तर अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटासाठी चर्चेत असतानाच, तो मामा होण्याचे कर्तव्य देखील उत्तम प्रकारे पार पाडत आहे. सलमान खान आपल्या भाचीच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हातात, पण.. ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

हा एक मनोरंजक थ्रिलर चित्रपट असणार आहे, जो परीक्षेच्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर केंद्रित आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अलिझेह आणि शालेय गणवेशात अभिनेत्यांचा एक गट, ‘A+’ चिन्हांनी वेढलेले आणि त्यांच्याकडून पैसे येत असल्याचे दिसत आहेत.

सलमानने त्याच्या पोस्टमध्ये हे मनोरंजक पोस्टर शेअर केले नाही तर चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर कधी प्रदर्शित होणार हे देखील सांगितले आहे. ‘फरे’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना सलमान खानने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “फरेचा ट्रेलर लवकरच 24 नोव्हेंबर दिवशी येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube