Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?

Elvish Yadav : रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचं विष पुरवणारा एल्वीश यादव नेमका कोण?

Who is Elvish Yadav : बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या (Salman Khan) ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळ्याची ट्रॉफी जिंकणारा एल्विश यादवच्या (Elvish Yadav) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)


रेव्ह पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे. एल्विशसोबत आणखी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या विरोधात नोएडामध्ये गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. 25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असतो. तो नेहमी शॉर्ट फिल्म्स देखील बनवत असतो. ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे. एल्विशला महागड्या, आलिशान गाड्यांची मोठ्या प्रमाणात आवड आहे.

बिग बॉस ओटीटी विजेता Elvish Yadav वर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण

बिग बॉस ओटीटीचं दुसरं पर्व 17 जून 2023 दिवशी सुरू झालं होतं. पुनीत सुपरस्टार, पूजा भट्ट, मनीषा रानी, बेबिका धुर्वे, साइरस ब्रोचा, अभिषेक मल्हान, आलिया सिद्दीकी, फलक नाज, अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, आकांक्षा पुरी आणि पलक पुरसवानी हे स्पर्धक ‘बिग बॉस ओटीटी 2’मध्ये सहभागी झाल्याचे बघायला मिळाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube