Bobby Deol : ‘ऐल्फा’ मधील बॉबी देओलच्या डी-एजिंगची सर्वत्र चर्चा

Bobby Deol : यश राज फिल्म्सचा आलिया भट्ट आणि शर्वरी अभिनीत धमाकेदार पॉपकॉर्न अ‍ॅक्शन मनोरंजनपट 'ऐल्फा ' जगभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे

Bobby Deol

Bobby Deol

Bobby Deol : यश राज फिल्म्सचा आलिया भट्ट आणि शर्वरी अभिनीत धमाकेदार पॉपकॉर्न अ‍ॅक्शन मनोरंजनपट ‘ऐल्फा ‘ जगभरातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत असून आतापर्यंत जगभरात 92.75 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रेक्षक चित्रपटातील दमदार अ‍ॅक्शन आणि रंजक कथानकाचा आनंद घेत असतानाच, चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या क्षणांपैकी एक म्हणजे बॉबी देओलचे अत्यंत वास्तवदर्शी डी-एजिंग. कथानकातील एका महत्त्वाच्या टप्प्यावर बॉबीला त्याच्या ‘सोल्जर’, ‘गुप्त’ आणि ‘बरसात’ काळातील तरुण रूपात दाखवण्यात आले असून, या दृश्याने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली आहे.

हा व्हिज्युअल चमत्कार यश राज फिल्म्सच्या अत्याधुनिक वीएफएक्स विभाग वायएफएक्स स्टुडिओजने साकारला आहे. हा परिणाम केवळ दृश्यात्मक आकर्षणासाठी नसून, कथेला भावनिकदृष्ट्या अधिक प्रभावी बनवण्यासाठी वापरण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांना पात्राच्या आयुष्यातील त्या विशिष्ट टप्प्यावर तो खरोखरच तरुण दिसत असल्याचा नैसर्गिक अनुभव मिळतो. दिग्दर्शक शिव रवैल यांच्या दृष्टीकोनानुसार वायएफएक्स स्टुडिओजने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सूक्ष्म कलाकुसर यांचा संगम साधत हा परिणाम साधला.

याबाबत शिव रवैल म्हणाले,”सुरुवातीपासूनच आमच्यासाठी हा व्हिज्युअल इफेक्ट केवळ दृश्य आकर्षणासाठी नव्हता. माझ्यासाठी प्रत्येक सर्जनशील निर्णय हा कथेला पुढे नेणारा असावा लागतो. प्रेक्षकांना पात्राच्या आयुष्यातील एका विशिष्ट काळात ते त्याला पाहत आहेत, यावर विश्वास बसणे आवश्यक होते. जर हा भास नैसर्गिक वाटला नसता, तर भावनिक परिणामही तितकाच प्रभावी झाला नसता. आमचे उद्दिष्ट तंत्रज्ञान पूर्णपणे अदृश्य ठेवण्याचे होते, जेणेकरून प्रेक्षकांचे लक्ष परिणामावर नव्हे, तर कथा आणि अभिनयावर राहील.”

पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेतलेल्या बॉबी देओल (Bobby Deol) ने सांगितले , “माझ्या चेहऱ्यावरून अनेक वर्षे जणू गायब झाल्यासारखे पाहणे हा खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता. माझ्या कारकिर्दीत मी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, पण असा अनुभव प्रथमच आला. चित्रपटसृष्टी किती वेगाने विकसित होत आहे, याची जाणीव यामुळे झाली. मात्र तंत्रज्ञान फक्त एका मर्यादेपर्यंतच मदत करू शकते. पात्रातील भावना प्रामाणिकपणे सादर करणे हे अभिनेत्यालाच करावे लागते. हीच माझ्यासाठी सर्वात रोमांचक बाब होती.” या यशामागे वायआरएफ च्या इन-हाऊस वायएफएक्स विभागाची महत्त्वाची भूमिका आहे.

वायएफएक्स स्टुडिओज ची प्रमुख आणि वायएफएक्स सुपरवायझर शेरी भारदा म्हणाली, “आजचे प्रेक्षक अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्ट पाहतात. त्यामुळे व्हिज्युअल इफेक्ट्स जवळपास पूर्णपणे अदृश्य असणे आवश्यक आहे. वायएफएक्स मध्ये आम्ही प्रथमच संपूर्ण सिक्वेन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि वायएफएक्स यांचा इतक्या उच्च दर्जाने वापर केला. बॉबीच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील योग्य प्रकाशयोजना आणि अँगल्समधील संदर्भ सामग्री मर्यादित असल्याने आमच्या कलाकारांसाठी हे मोठे आव्हान होते. केवळ चेहरा तरुण दिसणे पुरेसे नसते; त्वचा, सुरकुत्या, डोळ्यांतील भाव यांसारख्या प्रत्येक सूक्ष्म तपशीलाची अचूकता महत्त्वाची असते. AI आधारित डी-एजिंगमध्ये ‘डेड आयज’ची समस्या सामान्य असते. त्यामुळे आम्ही AI आणि मानवी कौशल्याचा संयोग असलेली विशेष वायएफएक्स पाइपलाइन विकसित केली, ज्यामुळे प्रत्येक फ्रेमवर आमच्या कलाकारांचे पूर्ण नियंत्रण राहिले. डी-एजिंग म्हणजे फक्त एखाद्याला तरुण दाखवणे नव्हे, तर त्याच्या अभिनयातील भावना तितक्याच जिवंत ठेवणे होय. आमच्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

मोदी जी न्याय द्या, 20 दिवसात 2 पिढ्या संपल्या अन्… राखी अग्रवाल यांचा PM मोदींना पत्र-

ऐल्फा मधील हे डी-एजिंग तंत्रज्ञान वायआरएफ च्या वायएफएक्स स्टुडिओजसाठी आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरला आहे. जागतिक दर्जाच्या चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञानामध्ये सातत्याने गुंतवणूक करतानाच, प्रत्येक तांत्रिक नवकल्पना ही कथेला अधिक प्रभावी बनवण्यासाठीच वापरण्याच्या वायआरएफ च्या दृष्टिकोनाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आदित्य चोप्रा निर्मित आणि शिव रवैल दिग्दर्शित ‘ऐल्फा ‘मध्ये आलिया भट्ट,शर्वरी , बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट सध्या जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Exit mobile version