Bohada Marathi Movie Tradition: चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. (Marathi Movie) आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय पुराणातील भव्य दिव्य मुखवट्यांना पूजून करायचा उत्सव म्हणजे “बोहाडा”. 2025 या वर्षात भेटीला येणाऱ्या बोहाड्या’ची घोषणा (Bohada Movie) नुकतचं करण्यात आली असून (Social media) दाक्षिणात्य निर्माता मणीगंडन मंजुनाथन ‘बोहाडा’ची निर्मिती करणार आहेत.
राहुल सतिश पाटील, कृतिका तुळसकर देवरूखकर सहनिर्मिती, विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन अंबर विनोद हडप यांनी केले आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण हटके कलाकार झळकणार, याबाबत आणखी खुलासा करण्यात येणार आहे.
या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ” निसर्गाची आपल्यावर जी कृपा आहे, त्याचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. खंत या गोष्टीची आहे की, आतापर्यंत हा उत्सव लोकांना माहित नव्हता. हा परंपरागत उत्सव आहे, त्यामुळे या रूढी, परंपरा या चित्रपटातून मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. या चित्रपटाच्या माध्यमातून हा उत्सव लोकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे निसर्गाशी संबंधित असल्याने यात मजा, सस्पेन्स, थ्रिलर यांचे मिश्रण असणार.
Sonu Sood: अभिनेता सोनू सूद करणार आयएएस कोचिंग शिष्यवृत्तीसाठी मदत, म्हणाला…
त्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव येणार आहे. वर्षात 52 आठवडे असतात, 52 सोंगेही असतात, जे त्यांचे अस्तित्व दाखवत असतात. परंतु याचा थांगपत्ता आपल्याला नसतो. हेच या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या विषयाचे नावीन्यही अफाट आहे, महाराष्ट्राच्या जंगलात लपलेल्या संस्कृतीवर आधारीत चित्रपट करण्याचा मोह दाक्षिणात्य निर्मात्यांनाही आवरला नाहीये. मराठी सिने दिग्दर्शक म्हणून मला अभिमान वाटतोय की, आपल्या विषयाला दाक्षिणात्य निर्माता पसंती दर्शवत आहेत.