Download App

Bolaych Rahun Gel: ‘बोलायचं राहून गेलं’ मराठी चित्रपटाची घोषणा; अभिजीत आमकरसह ‘हे’ कलाकार साकारणार भूमिका

Bolaych Rahun Gel Announcement: आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे.

Bolaych Rahun Gel Announcement: आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. (Social Media) रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. (Marathi Movie) तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ या (Bolaych Rahun Gel Movie) चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.


जिजा फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती आहेत. निर्मितीसोबतच कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिषेक उत्कर्ष कोळी यांनी सांभाळली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत तंत्रज्ञही उपस्थित होते. या चित्रपटात अभिषेक कोळी एक अनोखी लव्ह स्टोरी सादर करणार असल्याचं ‘बोलायचं राहून गेलं’ या शीर्षकावरून सहज लक्षात येतं. इतर प्रेमकथांपेक्षा हा चित्रपट वेगळ्या वाटेने जाणारा असल्याचे संकेत शीर्षकावरून मिळतात. शीर्षकाला अनुसरून अभिषेक यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून, आजतागायत कधीही समोर न आलेल्या पैलूंचा समावेश केला आहे.

दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या साथीने सुमधूर गीत-संगीताची किनार जोडण्यात आल्याने ‘बोलायचं राहून गेलं’च्या रूपात प्रेक्षकांना एक संगीतप्रधान प्रेमकथा पाहायला मिळेल असा विश्वास अभिषेक कोळी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, एक फ्रेश कथानक ‘बोलायचं राहून गेलं’ या चित्रपटात आहे. तरुणाईसोबतच सर्व वयोगटांतील रसिकांना नजरेसमोर ठेवून बनवलेला हा एक परिपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे. रोमान्स, कॉमेडी, इमोशन्सचा अद्भूत संगम असलेली अलौकीक प्रेमकथा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे. ‘बोलायचं राहून गेलं’ची कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असेही अभिषेक कोळी म्हणाले.

Kastoori Marathi Movie : कस्तुरी चित्रपटाचे कलाकार चित्रपटाबद्दल काय सांगतात? पाहा व्हिडिओ 

या चित्रपटात अभिजीत आमकर, गणेश यादव, अरुण नलावडे, उमेश राव, अस्मिता सुर्वे आदी कलाकार आहेत. संगीतकार कुणाल-करण या चित्रपटातील गीतांना संगीत देणार आहेत. निलेश वि. गमरे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून संकेत बारे लाइन प्रोड्युसर आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

follow us