Download App

Drishyam 3: अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ कधी येणार, दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा

Drishyam 3: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) सध्या त्याच्या आगामी ‘शैतान’ (Shaitan Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता खूपचं वाढली आहे. शैतान हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच एक भयानक कथा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची काही दृश्ये पाहून तुम्हाला ‘दृश्यम’ची आठवण झाली असणार आहे. अजय देवगण आणि त्याची लेकीचे कुटुंब आहे. तिला सैतानापासून वाचवण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसणार आहे.

काल ट्रेलर लाँचच्या वेळी अजय देवगण, आर माधवन व्यतिरिक्त चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट पाहायला मिळाली. यादरम्यान चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांना ‘दृश्यम 3’बद्दल विचारण्यात आले की, तो ‘दृश्यम 3’ कधी फ्लोअरवर घेणार आहे. त्याला उत्तर देताना अभिषेक पाठक म्हणाले, ‘दृश्यम 3’ कागदावर तयार आहे. दरम्यान, मी एक स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. त्यामुळे या वर्षी मी माझा पुढचा चित्रपट दिग्दर्शित करेन अशी आशा आहे.

दृश्यम आणि दृश्यम 2 नंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. ‘दृश्यम 3’ही नक्की येणार हे या चित्रपटाच्या सिक्वेलच्या कथेच्या शेवटावरून स्पष्ट झाले होते. मात्र सध्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दृष्यमचे दोन्ही भाग चाहत्यांना खूप आवडले होते. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने गल्ला कमावला होता.

Shaitan Trailer : अजय देवगणच्या शैतानचा काळजाचा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

शैतान व्यतिरिक्त अजय देवगणचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. अभिनेत्याचा आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ देखील सतत चर्चेत असतो. अजयच्या सिंघम अगेनमध्ये अनेक मोठे स्टार्स कॅमिओ करणार आहेत. अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि श्वेता तिवारी यांच्याही कॅमिओ आहेत. त्याचवेळी अर्जुन कपूर या चित्रपटात एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

follow us