Download App

Anupam Kher: अनुपम खेर यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल व्यक्त केल्या भावना; म्हणाले…

Anupam Kher spoke about Ram Mandir : पुढील वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Lalla Mandir in Ayodhya) उद्घाटनाची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत आणि इतरही मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नुकतंच या सोहळ्याबद्दल बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर ( Anupam Kher) यांनी भाष्य केल्याचे बघायला मिळाले आहे.


अनुपम खेर ही या मनोरंजनसृष्टीतील पहिली व्यक्ती आहे, ज्यांनी त्याठिकाणी जाऊन प्रथम प्रार्थना केल्याचे सांगितले जात आहे. याबद्दल अनुपम खेर म्हणाले की, “22 जानेवारी 2024 या ऐतिहासिक दिवसाची सर्वजणच मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. अखेर प्रभू श्रीराम यांचं मंदिर लोकांसाठी लवकरच खुलं करण्यात येणार आहे. हिंदूंनी याबद्दल कायदेशीर मार्गाने एक मोठा लढा दिला आहे.

पुढे अनुपम खेर म्हणाले की, “या गोष्टीबद्दल मला सार्थ अभिमान आहे की या मनोरंजनसृष्टीतील मी असा पहिला कलाकार आहे, जो त्या मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करायची संधी मिळाली. मला उद्घाटनसोहळ्याला निमंत्रण असो किंवा नसो मी त्यादिवशी या ठिकाणी जाणार हे ठरलंय. गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री कंगना रणौतने देखील या मंदिराला भेट दिली होती. ‘तेजस’च्या प्रदर्शनाच्या अगोदर कंगनाने राम मंदिराला भेट देऊन आशीर्वाद घेतले होते.

Malaika Arora: ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मलायका अरोरा थिरकली! Video Viral

तसेच 16 जानेवारीपासून या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात होणार असून 22 जानेवारी 2024 दिवशी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने अयोध्येचा ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यानंतर केंद्र सरकारने याठिकाणी भव्य राम मंदिर उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 4 वर्षांनी आता हे भव्य राम मंदिर भाविकांसाठी लवकरच खुले करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us