Navratri Garbo Song: पीएम मोदींच्या गाण्यावर होणार गरबा! सोशल मीडियावर व्हिडिओ प्रदर्शित

Navratri Garbo Song: पीएम मोदींच्या गाण्यावर होणार गरबा! सोशल मीडियावर व्हिडिओ प्रदर्शित

Navratri Garbo Song: नवरात्रीच्या अगोदरच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी लिहिलेले गरबा गाणे सध्या यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याला सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रेक्षक मोठी पसंती देत (Navratri Garbo Song) असल्याचे बघायला मिळत आहे.

नवरात्रीसाठी पीएम मोदींच्या गाण्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली होती. जॅकी भगनानी निर्मित आणि नदीम शाह दिग्दर्शित, हे गरबा गाणे भानुशालीने गायले आहे. या गाण्याला तनिष्क बागची यांनी गोड आवाजात गायले आहे.


गायिका भानुशालीने ट्विट करत सांगितले आहे की, आम्हाला नवीन ताल, रचना असलेले गाणे तयार करायचे होते. त्यांनी चॅनलसाठी लिहिले की हे गाणे आणि व्हिडिओ जिवंत करण्यात चॅनलने आम्हाला खूप मोठी मदत केली आहे. हे ट्विट रिट्विट करत नरेंद्र मोदींनी त्यांचे आभार देखील मानले आहे.

मी वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्याच्या या सुंदर सादरीकरणासाठी. त्यातून अनेक आठवणी जाग्या झाल्या आहेत. मी बरीच वर्षे लिहीले नाही, परंतु गेल्या काही दिवसांत मी एक नवीन गरबा लिहू शकलो आहे. विशेष म्हणजे यंदा 9 दिवस चालणारा नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या काळात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये हा सण मोठ्या उत्सहाने साजरे केले जात असतात.

Priya Bapat: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार अन् चर्चा सुरु…

तसेच पंतप्रधानांनी लिहिलेले हे गाणे नवरात्रीच्या सणाबद्दल असल्याचे बघायला मिळत आहे. जे अनेक वेगवेगळ्या राज्यांतील लोकांना त्यांची संस्कृती आणि परंपरा आत्मसात करून एकत्र आणत असते. जॅकी भागवानी याबद्दल सांगितले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या संगीत प्रकल्पाचा भाग असणे हा माझ्यासाठी आणि जेजस्ट म्युझिकसाठी खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube