Malaika Arora: ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मलायका अरोरा थिरकली! Video Viral

Malaika Arora: ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मलायका अरोरा थिरकली! Video Viral

Malaika Arora Dance Video Viral: बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सध्याच्या घडीला अतिशय लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora). एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असे मलायकाचे वयाच्या 47व्या वर्षी सौंदर्य आहे. ती अनेकवेळा फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी टीप्स देत असल्याचे बघायला मिळत असते. सध्या सोशल मीडियावर (Social media) मलायकाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल (Video Viral) होत असल्याचे बघायला मिळत आहे. या व्हिडीओत मलायका मराठमोळ्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)


नुकताच मलायकाने झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. या कार्यक्रमच्या मलायकाने ‘ऐका दाजीबा’ या गाण्यावर थिरकली आहे. त्यासाठी तिने मराठमोळा लूक देखील केला आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, हातात लाल बांगड्या, केसात गजरा असा सुंदर मराठमोळा लूक मलायकाने यावेळी गाण्यासाठी केल्याचे पाहायला मिळाले आहे. तिचा या लूकमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

मलायकाने या पुरस्कार सोहळ्यामध्ये फक्त डान्स केला नाही तर श्रेया बुगडे कडून बेसनाचे लाडू देखील बनवायला शिकून घेतले आहे. हे खास लाडू मलायका सारेगम लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सलील कुलकर्णींसाठी बनवली आहे. तसेच मलायकाने या कार्यक्रमामध्ये जोरदार धमाल केली आहे.

Burglary At Pushkar Shrotri House: मराठी अभिनेत्याच्या घरीच चोरांनी मारला डल्ला

आता हा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे बघायला मिळणार आहे? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. 4 नोव्हेंबर दिवशी संध्याकाळी 7 वाजता झी मराठी पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात मलायकासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित म्हणजेच धक धक गर्ल देखील हजेरी लावणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube