Burglary At Pushkar Shrotri House: मराठी अभिनेत्याच्या घरीच चोरांनी मारला डल्ला

Burglary At Pushkar Shrotri House: मराठी अभिनेत्याच्या घरीच चोरांनी मारला डल्ला

Burglary At Pushkar Shrotri House: मराठी मनोरंजनसृष्टीमधील (Entertainment) लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्रीसोबत (Pushkar Shrotri) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घरात काम करणाऱ्या महिलेनेच चोरी केली आहे. या महिलीने अभिनेताच्या घरातील मोल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. (Pushkar Shrotri House Theft) पुष्करला याविषयी कळताच त्याने पोलिसात (Police) धाव घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rima SA (@rima.sa.125)


अभिनेत्याने उषा घांगुर्डे आणि भानुदास घांगुर्डे या घरात काम करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याने या दोघांविरोधात फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे. तक्रारीमध्ये पुष्करने घरातील लाखो रुपयांची रक्कम, तसेच परदेशी चलन आणि दागिने चोरी झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावर अभिनेत्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अभिनेता हा विलेपार्ले परिसरात राहतो. कामात सतत व्यग्र असल्यामुळे वडिलांची काळजी घेण्यासाठी पुष्करने तीन मदतनीस ठेवले आहे. त्यांच्यापैकी एक असलेल्या उषा घांगुर्डे (वय 41) ही महिला गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून त्याच्याकडे सकाळी 8 ते रात्री 8 असे 12 तास काम करत होती. तिने पुष्करच्या घरातून 1.20 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 60 हजार रुपयांची फॉरेन करन्सी डल्ला मारला आहे.

Kiran Mane: ‘जरांगे पाटलांच्या धैर्याला सलाम’; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट

अभिनेत्याची पत्नी प्रांजलला उषाच्या वागण्यावर थोडा संशय आला होता. त्यानंतर पुष्करने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी उषाची कसून चौकशी केली. उषाने चोरी केल्याची कबूली देत ते पैसे विकून पतीला दिल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण इथेच थांबले नाही. 24 ऑक्टोबर दिवशी प्रांजलने कपाटातून काही दागिने काढले होते. त्या दागिन्यांमध्ये काही तरी गडबड असल्याचे तिला समजलं सोनाराला ते दागिने दाखवताच बनावट असल्याचे उघड झाले आहे. 26 ऑक्टोबर दिवशी विलेपार्ले पोलीस ठाण्यात उषा आणि तिच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 34, 381, 406आणि 420 अंतर्गत त्यांच्यावर हा गुन्हा दाखव करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube