Kangana Ranaut: बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगनाच्या ‘तेजस’चा दमदार टीझर पाहिलात का?

Tejas Teaser Out: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लागोपाठ वेगवेगळ्या विषयामुळे कायम चर्चेत येत असते. यंदा ती आगामी सिनेमाच्या विषयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आगामी ‘तेजस’ (Tejas) या हिंदी सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. (Social media) ‘तेजस’चा टीझर अतिशय दमदार असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या सिनेमातील संवाद देखील खूपच हटके असल्याचे […]

Kangana Ranaut

Kangana Ranaut

Tejas Teaser Out: अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) लागोपाठ वेगवेगळ्या विषयामुळे कायम चर्चेत येत असते. यंदा ती आगामी सिनेमाच्या विषयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या आगामी ‘तेजस’ (Tejas) या हिंदी सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. (Social media) ‘तेजस’चा टीझर अतिशय दमदार असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच या सिनेमातील संवाद देखील खूपच हटके असल्याचे दिसत आहे.


तसेच बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ कंगनाचा ‘चंद्रमुखी 2’ हा सिनेमा सध्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आपल्या अभिनयाची मोठी छाप सर्वत्र पाडली आहे. आता ‘तेजस’ या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री पुन्हा एकदा रुपेरी पडदा गाजवणार असल्याचे बघायला मिळणार आहे. ‘तेजस’ या सिनेमामध्ये कंगना रनौत वैमानिकेच्या मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘तेजस’ या सिनेमाचा टीझर खूपच धमाकेदार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. वैमानिकेची भूमिका कंगनाने चोख बजावली असल्याचा अंदाज टीझरवरुन बघायला मिळत आहे. या टीझरच्या सुरुवातीला कंगना वैमानिकेच्या मुख्य भूमिकेत बघायला मिळत आहे. त्यावेळी बॅकग्राउंडला आवाज येत आहे, “प्रत्येक गोष्ट बोलण्याची गरज नाही. आता आमने-सामने येण्याची वेळ आली आहे. आता आभाळातून पाऊस नव्हे तर आग येण्याची गरज आहे. भारत को छेडोंगे तो छोडेंगे नही असे टीझरच्या बॅकग्राउंडला आवाज येत आहे.

Kasturi: ठरलं! सफाई कामगाराची कथा सांगणारा ‘कस्तुरी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तेजस’च्या टीझरमधील पंगाक्वीनचा हटक्या अंदाजात बघायला मिळत आहे. तसेच सिनेमाचा टीझर बघून अंगावर शहारे आणणारा आहे. ‘तेजस’ या सिनेमामध्ये कंगना आणि वरुण मित्रा यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना बघायला मिळणार मिळणार आहे. तसेच सर्वेश मेवाडा यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे तर दिग्दर्शनाची धुरा देखील त्यांनी यावेळी सांभाळली आहे. ‘तेजस’ हा सिनेमा आधी 8 ऑक्टोबर 2023 रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार होता. परंतु नंतर या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 27 ऑक्टोबर दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Exit mobile version