आयकॉनिक म्युझिक चॅनेल एमटीव्हीच्या तब्बल 44 वर्षांच्या प्रवासाला कायमचा ब्रेक

अविस्मरणीय क्षणांमुळे संपूर्ण पिढी घडवणाऱ्या क्लब एमटीव्ही आणि एमटीव्ही लाईव्ह हे संगीतप्रधान चॅनेल तब्बल 44 वर्षांनंतर बंद.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 01 04T122432.878

Iconic music channel MTV’s 44-year journey comes to a permanent halt : जागतिक टेलिव्हिजन आणि तरुणाईच्या संस्कृतीत क्रांती घडवणारे आयकॉनिक म्युझिक चॅनेल एमटीव्ही (MTV) एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. अभूतपूर्व म्युझिक व्हिडिओ, व्हीजे संस्कृती आणि पॉप कल्चरच्या अविस्मरणीय क्षणांमुळे संपूर्ण पिढी घडवणाऱ्या एमटीव्हीचे एमटीव्ही म्युझिक, एमटीव्ही 80, एमटीव्ही 90, क्लब एमटीव्ही आणि एमटीव्ही लाईव्ह हे संगीतप्रधान चॅनेल(Music Chanel) तब्बल 44 वर्षांनंतर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे “आय वॉन्ट माय एमटीव्ही” असा जयघोष करत मोठी झालेल्या पिढीसाठी हा एका युगाचा अंत मानला जात आहे.

दरम्यान, एमटीव्ही ब्रँडचे प्रसारण यूके, आयर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, पोलंड, हंगेरी, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील यांसारख्या अनेक देशांमध्ये नव्याने किंवा वेगळ्या स्वरूपात सुरू होणार असले, तरी पारंपरिक म्युझिक व्हिडिओवर आधारित चॅनेल्सचा पडदा कायमचा पडला आहे. या निर्णयानंतर जगभरात भावना उसळल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर चाहत्यांनी एमटीव्हीला भावनिक श्रद्धांजली वाहिली आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या बंदबाबत दुःख व्यक्त करत नेटकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सत्ताधाऱ्यांचा ‘True Caller’ आज निवृत्त झाला, रश्मी शुक्लांचा कार्यकाळ संपताच काँग्रेसचा खोचक टोला

एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, “यूट्यूबने एमटीव्हीला मारले,” तर दुसऱ्याने भावनिक विनंती करत लिहिले, “आमच्या आठवणी काढून घेऊ नका.” “एका युगाचा अंत,” “एमटीव्ही दुखावले,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अनेकांसाठी एमटीव्ही हे केवळ एक चॅनेल नव्हते, तर ती एक जीवनशैली होती. नवीन कलाकारांची ओळख, जागतिक संगीत संस्कृती, फॅशन ट्रेंड्स आणि टीव्हीसमोर बसून म्युझिक व्हिडिओ पाहण्याची प्रतीक्षा, या सगळ्या आठवणी आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत.

डिजिटल आणि ऑन-डिमांड प्लॅटफॉर्मच्या युगात मीडिया वापराच्या सवयी बदलत असताना, एमटीव्हीच्या म्युझिक चॅनेल्सचं बंद होणे ही केवळ व्यावसायिक घटना नसून, ती सामूहिक अनुभवातून वैयक्तिक स्क्रीनकडे झालेल्या सांस्कृतिक बदलाची खूण मानली जात आहे. एमटीव्ही ब्रँड भविष्यात वेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील, मात्र संगीताच्या माध्यमातून संपूर्ण पिढीला जोडणाऱ्या त्या टेलिव्हिजन युगाला आज कायमचा निरोप मिळाला आहे.

follow us