Download App

R Madhavan : ‘या’ कारणामुळेच अभिनेता आर माधवन ठरतो मल्टी हायफेनेट!

  • Written By: Last Updated:

R Madhavan : अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. आज दोन्ही ठिकाणी माधवनचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. त्याने कथालेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून स्वत:ला सिध्द केलं. अलीकडेच दिग्दर्शनात पदार्पण करून तो आपला रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (Rocketry: The Numby Effect) हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला.

कसोटी क्रिकेटमध्ये महिला संघाने रचला इतिहास, दीप्ती शर्माची घातक गोलंदाजी 

या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. तीन भाषांमध्ये बनवलेल्या चित्रपटाचा हा गौरव आहे.

माधवन हा नेहमीच ट्रेंडसेटर आणि युथ आयकॉन ठरला आहे. त्याच्या क्षेत्रात तो कायम अग्रगण्य ठरला. रॉकेट्री मधल त्याचं वेगळंपण हे अनोखं ठरलं आणि जागतिक स्तरावर कोणीही न कमावलेलं नाव कमावलं. सध्या “द रेल्वे मेन” या वेब सिरीजमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तो प्रशंसा मिळवत आहे. मॅडीने एक अभिनेता म्हणून आणि आता एक प्रतिष्ठित चित्रपट निर्माता म्हणून खूप लांब पल्ला गाठला आहे. संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत तो भारतीय चित्रपट उद्योगात एक ट्रेलब्लेझर व्यक्ती ठरला आहे.

Ratan Tata : टाटांना धमकावणारा ‘MBA’ पण, ‘स्किझोफ्रेनिया’ ग्रस्त; पोलिसांसमोर आली वेगळीच स्टोरी 

व्यापार विश्लेषक जोगिंदर टुटेजा म्हणतात, “आर. माधवनने ज्या प्रकारे पुढे जाऊन ‘द रेल्वे मेन’ मध्ये काम केले आहे ते पाहणे खरोखर खूप आनंददायी आहे. तो सुमारे अडीच दशके काम करत असल्यामुळे त्याच्या अष्टपैलुत्वाची ओळख प्रत्येक प्रोजेक्ट मधून दिसून येते. ज्या प्रकारे तो अजूनही चित्रपट साइन करत आहे आणि OTT शो मध्ये आपल्या कामाची जादू दाखवत आहे हे बघण उत्सुकतेच आहे. मला त्याला दरवर्षी आणखी हिंदी प्रोजेक्ट्स (चित्रपट/OTT) मध्ये बघायचे आहे.”

आर माधवनने २०२२ मध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्टस हा बायोपिक चित्रपट केला. हा चित्रपट एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित आहे. त्याने केवळ एक उत्कृष्ट नमुनाच तयार केला नाही तर चित्रपट निर्माते म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्याने सिनेमॅटिक लँडस्केपची नवी व्याख्या तयार केली आहे. स्वप्ने पाहण्याची आणि पुन्हा परिभाषित करण्याची हिंमत त्याने यातून केली आहे.

दरम्यान, आर माधवन पुन्हा एकदा नव्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. आता तो महान शास्त्रज्ञ जीडी नायडू यांची भूमिका साकारत असल्याचं बोलल्या जातं.

Tags

follow us