Ratan Tata : टाटांना धमकावणारा ‘MBA’ पण, ‘स्किझोफ्रेनिया’ ग्रस्त; पोलिसांसमोर आली वेगळीच स्टोरी

Ratan Tata : टाटांना धमकावणारा ‘MBA’ पण, ‘स्किझोफ्रेनिया’ ग्रस्त; पोलिसांसमोर आली वेगळीच स्टोरी

Ratan Tata Threat Call : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना आज धमकी देण्यात (Ratan Tata Threat Call) आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या व्यक्तीच्या धमकीनंतर पोलिसांनी रतन टाटांच्या सुरक्षेत वाढ केली होती. दुसरीकडे या व्यक्तीचा शोध घेण्याचेही काम सुरू केले होते. अखेर पोलिसांनी त्याचा माग काढलाच परंतु, नंतर पोलिसांना वेगळीच स्टोरी समजली. फोन करणारा व्यक्ती एमबीए इंजिनीअर आहे. पण, त्याला स्किझोफ्रेनिया हा आजारही आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सांगितले की या धमकी देणाऱ्या व्यक्तीने रतन टाटांची (Ratan Tata) सुरक्षा वाढविण्यास सांगितले होते. जर त्यांची सुरक्षा वाढविली नाही तर त्यांची अवस्था टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्यासारखी होईल.

ज्यावेळी या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला त्यावेळी या फोन करणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन कर्नाटकात आढळून आले. हा व्यक्ती पुण्यातील रहिवासी असल्याचे समजले. त्यानंतर पोलीस त्याच्या पुण्यातील घरी धडकले. येथे त्यांना वेगळाच प्रकार समजला. फोन करणारा व्यक्ती पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. तसेच त्याच्या पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. या व्यक्तीच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की त्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार आहे. त्याने कुणालाच न सांगता एका घरात घुसून हा कॉल केला होता.

रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन

प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा 4 सप्टेंबर 2022 रोजी कार दुर्घटनेत मृत्यू झाला होता. धमकीचा कॉल येताच पोलीस अलर्ट झाले. एक विशेष पथक नियुक्त करून त्यांच्याकडे रतन टाटांचा सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. तर दुसऱ्या टीमला कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम देण्यात आले. तांत्रिक सहाय्यक आणि दूरसंचार कंपनीच्या मदतीने कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला.

या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये फोन करत रतन टाटा यांना धमकी दिली होती. हा व्यक्ती स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त आहे. तो मानसिक रुपाने आजारी आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, याआधी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांनाही जिवे मारण्याच्या धमकीचे ईमेल आले होते. धमकी देणाऱ्याने वीस कोटी रुपयांच्या खंडणीचीही मागणी केली होती. या प्रकरणात पोलिसांना असं वाटत आहे की कुणीतरी व्हीपीएन नेटवर्कच्या मदतीने कुठेतरी बसून असे उद्योग करत आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube