Download App

Rajkummar Rao : ‘श्रीकांत’ सिनेमातील राजकुमारचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला, म्हणाले…

Rajkummar Rao First Look Release : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. त्याने आतापर्यंत “स्त्री, शादी में जरूर आना, बधाई हो” सारखे अनेक हिट सिनेमा दिले आहेत. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने करिअरमध्ये अनोखी ओळख निर्माण केली आहे. आता 2024 वर्षात राजकुमार राव हा अनेक नवनवीन चित्रपट करताना दिसणार असून त्याचा आगामी “श्रीकांत” (Srikanth Movie) मधला पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.


तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर यांच्या प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. टी सिरीज (T-Series) आणि Chack N Cheese Films ने राजकुमार राव अभिनीत ‘श्रीकांत – आ रहा है सबकी आंखे खोलने’ चा पहिला लूक आउट झाला आहे. पहिल्या लूकमध्ये राज अगदीच वेगळ्या लूकमध्ये दिसतोय.

चित्रपटाच्या फर्स्ट लूक मोशन पोस्टरमध्ये कॅप्चर केलेल्या एका अनोख्या लूक मध्ये श्रीकांतच्या भूमिकेत राजकुमारला शर्यतीची अंतिम रेषा ओलांडताना, त्याच्या अतुलनीय धैर्याचा आणि चिकाटीचा पुरावा म्हणून पाहिले जाऊ शकते. मोशन पोस्टरमध्ये ‘पापा कहते हैं’ या सदाबहार गाण्याच्या संगीताची झलकही पाहायला मिळते.

लोअर परेलमध्ये प्रथमच ‘कुलस्वामिनी भैरी भवानी’ चैत्र नवरात्रौत्सव; शेलार दाम्पत्याचा पुढाकार

‘श्रीकांत – आ रहा है सबकी आँखे खोलने’ तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आहे, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित आहेत. हा चित्रपट 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित होत आहे.

follow us