Download App

रणवीरनंतर आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने केले न्यूड फोटोशूट; म्हणालो ‘मी 7-8 दिवस एकटाच..’

  • Written By: Last Updated:

Vidyut Jammwal nude photos: वर्षभरापूर्वी अभिनेता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची खूप चर्चा झाली होती. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे न्यूड फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali : लाल रंगाच्या साडीत खुललं प्राजक्ताचे सौदर्यं, चाहते घायाळ! 

विद्युत जामवाल आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. या खास दिवशी तिने इन्स्टाग्रामवर आपला न्यूड फोटो शेअर केलेत. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्युतने त्याचे तीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विद्युत जंगलात दिसत आहे. या फोटोंमध्ये तो न्यूड दिसत आहे. एका फोटोत तो जंगलात नदीच्या काठावर बसलेला दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत तो नदीत आंघोळ करताना दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये विद्युत जामवाल चहा बनवताना दिसत आहे. या सर्व फोटोत तो कपड्यांशिवाय दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dheeraj Sahu : आतापर्यंत 300 कोटींचं घबाड जप्त, पण या पैशांचे पुढे काय होते? 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांने लिहिले- मी हिमालय पर्वत रांगेत परतलो आहे – देवाचे निवासस्थान’. याची सुरुवात 14 वर्षांपूर्वी झाली. मला कळायच्या आधी… दरवर्षी ७-१० दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.

लक्सरी आणि आनंदाच्या जीवनातून जंगलात येतांना मला माझा एकटेपणा शोधायला आवडतो आणि मी कोण नाही हे जाणून घेणं महत्वाचं आहे. पुढे तो लिहितो, मी आता माझ्या पुढच्या प्रवासासाठी तयार आणि उत्साही आहे – क्रॅक 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

विद्युतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, हा फोटो स्थानिक मेंढपाळ मोहर सिंगने काढला आहे. सध्या त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर नेटिझन्स कमेंट करत आहेत. त्याच्या फोटोंना पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

विद्युतने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. यानंतर तो अभिनय क्षेत्रात आला. 2012 मध्ये रिलीज झालेल्या ‘शक्ती’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘फोर्स’ चित्रपटातील विद्युत आणि जॉन अब्राहमच्या अॅक्शन सीन्सचे खूप कौतुक झालं होतं. त्याने ‘बुलेट राजा’, ‘कमांडो’, ‘कमांडो 2’ आणि ‘कमांडो 3’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.

Tags

follow us