IB 71 Teaser Release: अभिनेता विद्युत जामवालच्या अॅक्शन-थ्रिलर IB 71 चा टीझर रिलीज; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T162447.304

IB 71 Teaser Release: बॉलीवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) चा पुढचा सिनेमा ‘IB 71’ १२ मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विद्युतने इन्स्टाग्रामवर पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या ४७ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) विद्युत जामवालबरोबर गुप्त मोहिमेची योजना आखत असल्याचे दिसून येत आहे.

या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना विद्युत जामवालने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, टॉप सीक्रेट आता बाहेर आले आहे. तुमच्यासाठी सादर करत आहे, IB 71, १९७१ चे युद्ध जिंकणारे भारताचे गुप्तचर अभियान. ‘IB 71’ सिनेमात भारतीय गुप्तचर संस्था आणि पाकिस्तानी एजन्सी यांच्यात दोन आघाडीच्या युद्धाभोवती फिरतो.

संकल्प रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची निर्मिती टी-सीरीजच्या बॅनरखाली केली आहे. या सिनेमात अश्वथ भट्टही चाहत्यांना दिसून येणार आहेत. ज्याने हैदर, राझी आणि लम्हा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ काश्मीर सारख्या सिनेमात काम केले आहे.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

अलीकडे विद्युत जामवालाने त्याचा मित्र आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांची आठवण करून एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. विद्युतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर सिद्धार्थबरोबर पोज देत असल्याचा फोटो पोस्ट केला आहे. या दोघे जिममध्ये पोज देत असलयाचे चाहत्यांना दिसून आले आहे.

Tags

follow us