Download App

‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”

Kangana Ranaut: दीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाला भारतीय सिनेप्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती.

मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. ‘द केरला स्टोरी’सिनेमावर घालण्यात आलेल्या बंदीवर आता अभिनेत्री कंगना रनौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सिनेमावर घातलेली बंदी ‘असंवैधानिक’ असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर या सिनेमाच्या निमित्ताने तिने पश्चिम बंगाल सरकारला देखील फटकारलं आहे.


‘मिळालेल्या माहितीनुसार कंगना म्हणाली आहे की, “सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने पारित केलेल्या सिनेमावर बंदी घालणे म्हणजे संविधानाचा अपमान करण्यासारखे आहे. ‘द केरला स्टोरी’वर काही राज्यांनी घातलेली बंदी योग्य नाही. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीविरोधात लोकांच्या तक्रारी असल्याचेही कंगनाने यावेळी सांगितले आहे. त्यांना ज्या प्रकारचे सिनेमा बघायचे आहेत, त्या प्रकारचे सिनेमा बनत नसल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

‘द केरला स्टोरी’सारखा सिनेमा बनला की लोकांच्या तक्रारी दूर होतात. लोकांना जे सिनेमा बघायला आवडतात, त्याचा फायदा चित्रपटसृष्टीलाच होतो. ‘द केरला स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. ५ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत २०७.४७ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवरून २५० कोटी रुपयापेक्षा जास्त कमाई केली आहे.

वर्षातील तिसरा सर्वात मोठा बॉलीवूड चित्रपट

‘द काश्मीर फाइल्स’ने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा आरामात पार केला आहे. सलमानच्या ईदला रिलीज झालेल्या लाइफटाईम कलेक्शनने 110 कोटींचा आकडाही गाठला नाही. ‘पठाण’ आणि ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ आता 2023 चा तिसरा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.

The Kerala Story ची कोटी-कोटी उड्डाणे : बॉक्स ऑफिसवर रचला नवा इतिहास

‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात हिट

‘द केरळ स्टोरी’ हा वाद आणि चर्चेत अजूनही कायम आहे, पण चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट सुरूच आहे. पहिल्या दिवसापासूनच्या कमाईने आश्चर्यचकित करणारा, ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर ‘द काश्मीर फाइल्स’ प्रमाणेच करिष्मा करत आहे. पहिल्या 3 दिवसातच ब्लॉकबस्टर घोषित झालेल्या अदा शर्माच्या चित्रपटाने आठवड्याच्या मध्यभागी ज्या प्रकारे चांगली कमाई केली होती, ते पाहता दुसरा वीकेंड चित्रपटासाठी जबरदस्त कलेक्शन घेऊन येणार आहे हे निश्चित.

Tags

follow us