Download App

Radhika Apte: राधिका आपटेचा टॉलिवूडचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यानी केलं ट्रोल

 Radhika Apte controversial statement : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) कायमच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केवळ चित्रपटच नाही तर, राधिकाला ओटीटी विश्वाची राणी म्हटले जाते.

अनेक वेब सीरिजच्या (web series) माध्यमातून तिने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे. सध्या राधिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राधिका ही तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. राधिकाचा हा व्हिडीओ बघितल्यानंतर अनेकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे.


नेमकं काय म्हणाली?
सध्या राधिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) जोरदार धमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राधिका ही तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना असताना सांगितलं आहे की, “तेलुगू इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे जिथे मी सर्वात जास्त संघर्ष केला आहे. कारण ती इंडस्ट्री अतिशय पितृसत्ताक आहे. एक प्रकारे ती मनोरंजनसृष्टी पुरुषप्रधान आहे.

तिथे स्त्रियांना ज्या पद्धतीने वागवले जाते ते खरचं खूप वाईट आहे. पुढे तिने सांगितले आहे की, सिनेमातील पुरुषांची भूमिका ही देवासारखी आहे’, असं म्हणणारी असते. सेटवर तुम्हाला अनोख्या व्यक्तीप्रमाणे वागवले जाते. तो अभिनेता कलाकारांना काही विचारत नाही.अभिनेता सध्या चांगला मूडमध्ये नाहीये आणि त्याला चहा प्यायचा आहे, असे सेटवर सांगण्यात येते. यामध्ये मी कायम संघर्ष करत आले आहे आणि आता मी ते सोडून दिले आहे. मला अनेकदा असे वाटते की, हे फक्त माझ्याबरोबरच का घडत?

गुरु- सईच्या ‘कुछ खट्टा हो जाए’ची निराशाजनक सुरुवात; पहिल्याच दिवशी कमावले…

सध्या राधिकाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ खूप जुना असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वत्र तिला मोठ्या प्रमाणात जोरदार ट्रोल केलं जात आहे. तर काही नेटकाऱ्यानी मी तिच्या मताचा आदर करतो, परंतु एका व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आणि घटनेवर आधारित संपूर्ण उद्योगाला असे लेबल लावणे अयोग्य आहे.” अशी कमेंट केल्याचे पाहायला मिळाले आहे.

follow us