Sulakshana Pandit Death : बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन

Sulakshana Pandit Death : बॉलिवूडने आणखी एक रत्न गमावले आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले आहे.

Sulakshana Pandit Death

Sulakshana Pandit Death

Sulakshana Pandit Death : बॉलिवूडने आणखी एक रत्न गमावले आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन झाले आहे. सुलक्षणा यांंनी वयाच्या 71 व्या वर्षी गुरुवारी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री सुलक्षणा पंडित गेल्या अनेक वर्षापासून आजारी होत्या. माहितीनुसार गेल्या 16 वर्षांपासून त्या बेड रेस्टवर होत्या. सुलक्षणा यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर स्टार आणि चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit Death) यांनी 70 आणि 80  च्या दशकात दमदार अभिनयाने आणि सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. सुलक्षणा यांचा जन्म 1954 मध्ये झाला. सुलक्षणा प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची होत्या तर सुलक्षणा यांचे बंधू जतिन-ललित ही प्रसिद्ध संगीतकार जोडी होती. लहान वयातच संगीत प्रवास सुरू झाला सुलक्षणा पंडित यांनी लहान वयातच संगीत प्रवास सुरू केला.

वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी गायनाला सुरुवात केली. 1967 मध्ये त्यांनी पार्श्वगायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि लवकरच स्वतःला स्थापित केले. 1975 मध्ये सुलक्षणा यांना “संकल्प” चित्रपटातील “तू ही सागर है तू ही किनारा” या गाण्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्कार मिळाला.

Horoscope Today : आज पैशाच्या बाबतीत दोन राशी भाग्यवान; जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

चित्रपट कारकीर्द

गायनाव्यतिरिक्त, सुलक्षणा यांनी अभिनयातही बरीच प्रसिद्धी मिळवली. त्यांनी “उलझन” (1975) आणि “संकोच” (1976) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. सुलक्षणा पंडित यांनी कधीही लग्न केले नाही.

Exit mobile version