मोठी बातमी, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल

Dharmendra Hospitalised :  बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलिवूडचे सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची

  • Written By: Published:
Dharmendra Hospitalised

Dharmendra Hospitalised :  बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार बॉलिवूडचे सुपरस्टार आणि जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, सध्या धर्मेंद्र डॉक्टरांच्या देखरेखेखाली असून त्यांना रेगुलर चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

89 वर्षीय धर्मेंद्र (Dharmendra Hospitalised) यांची तब्येत सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या टीमकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर चाहाते त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

सुपरस्टार धर्मेंद्र यांना यापूर्वी देखील रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. स्नायू ताणामुळे त्यांना 2022 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी स्वत: एक व्हिडिओ मेसेजद्वारे चाहत्यांना आपल्या तब्येतीबद्दल माहिती दिली होती. बॉलिवूडमध्ये (Bollywood) ही-मॅन म्हणून ओळख असणारे धर्मेंद्र यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहे. ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘सीता और गीता’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. तर 2023 मध्ये  प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी मनभरून कौतुक केलं होतं.

अमेरिकेत 4,000 कोटी रुपयांचा घोटाळा, भारतीय वंशाचे सीईओ ब्रह्मभट्ट यांच्यावर आरोप

तर आता सुपरस्टार धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ या चित्रपटात दिसणार आहे. 1971  च्या भारत आणि पाकिस्तान युद्धातील शूरवीर अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर हा चित्रपट असणार आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

follow us