Mumbai Crime: सारा यंथन (२६) ही सिनेमासृष्टीतील मेकअप आर्टिस्ट (Makeup artist) मंगळवारी रात्री खार दांडा येथील ती भाड्याने राहात असलेल्या फ्लॅटमध्ये हातावर जखमा आणि रक्तबंबाळ स्थितीत मृतावस्थेत पंख्याला लटकलेला आढळला आहे. (Mumbai Crime) कोणीतरी तिची हत्या करून गळफास लावल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. खार पोलिस (Khar Police) आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.
मूळची नागालॅंड येथील सारा यंथन ही मुंबईत सिनेमा, टेलिव्हिजन आणि वेबसीरिजमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होती, बँकेत काम करणाऱ्या एका इसमाबरोबर तिचे संबंध होते आणि तो तिला लग्नासाठी बळजबरी करत होता, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी यावेळी केला आहे.
रविवारी सकाळपासून सारा फाेनला उत्तर देत नव्हती. तिच्या फ्लॅटच्या भाड्याची रक्कम थकलेली असल्याने सोमवारी एजंट भाड्यासाठी पुन्हा तिच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांना थोडासा संशय आला. त्याने तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. सोमवारी रात्री खार पोलिसांनी दरवाजा तोडला, तेव्हा सारा बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात दिसून आली आहे. पोलिसांना तिच्या दोन्ही हातावर कापल्याच्या खुणा देखील आढळल्या आहेत.
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा
पोलिसांनी नागालँडमध्ये राहणारी मृत साराची आई रोझी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना मंगळवारी मुंबईत आल्या आहेत. खार पोलिसांनी मंगळवारी दुपारी कूपर हॉस्पिटलमध्ये सारा यंथनचे पोस्टमॉर्टम केले आणि मृतदेह तिच्या आईकडे सोपवला आहे. रोझी म्हणाल्या की, रिझर्व्ह बॅंकेत काम करणाऱ्या एका व्यक्तीबरोबरच्या नात्याबद्दल तिने त्यांना सांगितले होते. तो माणूस लग्नासाठी तिला जबरदस्ती करत आहे, असे तिने सांगितले हाेते.
बेडरूममध्ये ती रक्ताच्या थारोळ्यात सापडली आहे. तिला कोणीतरी मारून नंतर फासावर लटकवल्यासारखे दिसून येत आहे. मला संशय आहे की तिची हत्या झाली आहे आणि पोलिसांनी याची चौकशी करून माझ्या मुलीला न्याय द्यावा, असे रोझी यांनी स्पष्ट केले आहे. पोलिस शवविच्छेदनाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकारांचा अधिक तपास पोलीस करत आहेत.