Saif Ali Khan Case : सैफ अली खानवरील चाकू हल्ला प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली आहे. ही महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर सर्वात आधी पश्चिम बंगालमध्येच थांबला होता. बांग्लादेशातून बेकायदेशीर पद्धतीने भारतात आला होता.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) येथील नादिया आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चौकशी केली होती. या दोन्ही जिल्ह्यांत हल्लेखोर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस गेले. या दरम्यान पोलिसांनी एका बंगाली महिलेला ताब्यात घेतले. हल्लेखोराच्या बाबतीत तिच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. या मुलीच्या नावावरील सिमकार्ड हल्लेखोर वापरत होता. ज्यावेळी तो बांग्लादेशातून भारतात आला तेव्हा त्याने येथील व्यक्तीच्या आयडीवरून सिम कार्ड घेतले होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या मुलीने सांगितले की बऱ्याच दिवसांपासून तिचा मोबाइल हरवला आहे. पोलिसांनी अजूनही पुढील चौकशी सुरुच ठेवली आहे.
Saif Ali Khan : जिन्यातून उतरला अन् कॅमेऱ्यात टिपला गेला; पोलिसांकडून आरोपीचा व्हिडिओ जारी
16 जानेवारी रोजी सैफ अली खानवर हल्ला झाला होता. यानंतर चार दिवसांनी पोलिसांनी शरीफुल इस्लाम याला अटक केली होती. हा आरोपी बेकायदेशीर पद्धतीने भारतात घुसला होता. त्याच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे सापडली नाहीत. मेघालयातील दाउकी नदी पार करून तो भारतात आला होता. काही आठवडे त्याने पश्चिम बंगालमध्येच घालवले. नंतर रोजगाराच्या शोधात थेट मुंबईत दाखल झाला. भारतीय नसल्याने येथे त्याला कुठेही चांगली नोकरी मिळाली नाही. परंतु, येथील विविध पबमध्ये साफसफाईचे काम त्याला मिळाले. मुंबईतून तो दररोज त्याच्या पालकांशी फोनवरून बोलत होता अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली.
चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी 16 जानेवारीला त्याच्या घरात घुसला आणि त्याने सैफवर सपासप वार केले. याच एका विचाराने अनेकांनी हैराण केलं आहे. या भागात सेलिब्रिटी व्यक्ती राहतात. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे हा संशोधनाचा विषय ठरेल. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तर या भागात खासगी सुरक्षा व्यवस्थाही आहेच. अभिनेते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेची व्यवस्था केली आहेत. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.
Saif Ali Khan : लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल!