Mumbai Gate Way Of India : बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या; ‘डेडिकटेड कॉमन मॅन’ शिंदेंचे निर्देश

Mumbai Gate Way Of India : बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या; ‘डेडिकटेड कॉमन मॅन’ शिंदेंचे निर्देश

Gate Way Of India : मुंबईतील बोट दुर्घटनेच्या बचावकार्याला वेग द्या, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाला जाणारी निलकमल बोटीचा अपघात घडला. या घटनेत फेरीबोट समुद्रात उलटली असून या बोटीत तब्बल 80 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. या घटनेतील 21 प्रवाशांना बचावण्यात यश आलं असून अद्यापही बचावकार्य सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

संविधान निर्मात्याबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला, अमित शाहांनी माफी मागावी, पटोलेंचा हल्लाबोल

भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, तटरक्षक दल, स्थानिक मच्छिमारांच्या बोटींच्या सहाय्याने बचावकार्य सुरु असून या बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच बोटीतील सर्वच प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढा अशाही सूचना एकनाथ शिंदेंनी बचावयंत्रणेला दिल्या आहेत. एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतलीयं.

मराठीत आणखी एक दमदार सिनेमा; “आता थांबायचं नाय” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून समुद्रात बोटीने प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक दाखल होत असतात. या पर्यटक प्रवाशांना समुद्राची सेहर करण्यासाठी फेरीबोट आहेत. या बोटीमधून पर्यटक समुद्रात फेऱ्या मारतात. समुद्रात निलकमल फेरीबोट प्रवास करीत असतानाच भारतीय नौदलाची एक स्पीडबोटीने धडक दिल्यानेच निलकमल प्रवासी बोट बुडाली असल्याचा आरोप मालकाकडून करण्यात आला आहे.

भेदभाव करू नका, लाडक्या बहिणींना २१०० रुपये द्या; उद्धव ठाकरेंनी सुनावलं

दुर्घटना घडल्यानंतर मुंबईतील कोस्ट गार्ड, पोलिस, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत 21 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओदेखील समोर आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडालीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या