Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरील (Saif Ali Khan) चाकू हल्ल्याला आता आठवडा उलटून गेला आहे. या हल्ल्यात जखमी झालेला सैफ उपचार घेऊन घरी परतला आहे. तर दुसरीकडे हल्लेखोरही पोलिसांनी गजाआड केला आहे. हल्ला नेमका का झाला, हल्लेखोराचा उद्देश काय होता याची माहिती पोलिसांनी दिली. आता या प्रकरणात सैफ अली खान प्रथमच व्यक्त झाला आहे. हल्ल्यावेळी नेमकं काय घडलं याचा खुलासा त्याने केला आहे.
मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी (Mumbai Police) सैफचा जबाब नोंदवून घेतला आहे. सैफ म्हणाला, 16 जानेवारीच्या रात्री मी आणि करिना अकराव्या मजल्यावर बेडरूममध्ये होतो. त्यावेळी मला नर्स एलियामा फिलीप हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हल्लेखोराने तिला पकडलं होतं. याच दरम्यान हल्लेखोराने माझ्या पाठीवर, मानेवर आणि अन्य ठिकाणी चाकूने हल्ला केला.
मला नर्सच्या आरडण्याचा आवाज आला. त्यावेळी आम्ही दोघे जहांगीरच्या खोलीकडे धावत सुटलो. तिथे आम्हाला एक अनोळखी व्यक्ती दिसला. जहांगीरही रडत होता. ज्यावेळी मला हल्लेखोराने चाकू मारला त्यावेळी शरीरातून रक्त वाहत होतं. कसंतरी करून मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून घेतलं. हल्लेखोराला धक्का देऊन मागं ढकललं.
मोदी सरकारची ‘एक’ सुधारणा सैफला भोवली.. 15 हजार कोटींची मालमत्ता स्वाहा!
दरम्यान, आता सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून तो त्याच्या घरीच आहे. हल्ला झाल्यानंतर जखमी अवस्थेत असताना त्याला एका ऑटो ड्रायव्हर भजन सिंग राणा (Bhajan Singh Rana) यांनी रुग्णालयात सोडलं होतं. येथे सैफचा मित्र अफसर जैदीने पुढील प्रोसेस पूर्ण करून त्याला दवाखान्यात अॅडमिट केलं. अफसर जैदी पटौदी परिवाराचे मित्र आहेत. सैफच्या घरच्यांनी त्यांना पहाटे साडेतीन वाजता फोन केला होता. त्यांनी लागलीच रुग्णालय गाठलं.
चोख सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असतानाही अज्ञात मारेकरी 16 जानेवारीला त्याच्या घरात घुसला आणि त्याने सैफवर सपासप वार केले. याच एका विचाराने अनेकांनी हैराण केलं आहे. या भागात सेलिब्रिटी व्यक्ती राहतात. त्यामुळे येथे सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात येथील सुरक्षा व्यवस्था कशी आहे हा संशोधनाचा विषय ठरेल. पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला तर या भागात खासगी सुरक्षा व्यवस्थाही आहेच. अभिनेते आणि सेलिब्रिटींनी त्यांच्या घराबाहेर सुरक्षेची व्यवस्था केली आहेत. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही आहेत.
ऑटो चालकाचं नशीब फळफळलं! बॉलिवूडमधील ‘हा’ गायक देणार एक लाखांचं बक्षीस