Download App

Lahore 1947: सनी पाजी अन् आमिर खान आले एकत्र; दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत 

Lahore 1947: अभिनेता सनी पाजीने (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री मारली आहे. 11 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) जोरदार कमाई केली. लोकांमध्ये या सिनेमाची क्रेझ आजून देखील बघायला मिळत आहे. आजपर्यंत हा सिनेमा अनेक सिनेमागृहांमध्ये सुरु असल्याचे बघायला मिळत आहे.


आतापर्यंत या सिनेमाची एकूण कमाई 500 कोटींच्या पुढे गेल्याचे बघायला मिळाले. तसेच आता सनी पाजीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. सनी देओल गदर २ नंतर अजून एका मोठ्या सिनेमात बघायला मिळणार आहे. या सिनेमासाठी त्याने बॉलीवूडचा सुपरस्टार आमिर खानसोबत (Aamir Khan)  हातमिळवणी केल्याचे बघायला मिळत आहे. या सिनेमाचं नाव आणि रिलीज तारीख देखील समोर आली आहे.

सनी पाजीच्या या नव्याकोऱ्या सिनेमाचं नाव ‘लाहोर 1947’ (Lahore 1947) आहे. आमिर खान या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तसेच एकेकाळचे सर्वोत्कृष्ट सिनेमा निर्माता राजकुमार संतोषी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तसेच सनी पाजी आणि आमिर खान, राजकुमार संतोषी या त्रिकुटासोबत हा आगामी काळात बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालणार हे निश्चित असणार आहे. आमिर खान आणि सनी पाजीने शेअर केलेल्या अपडेटमध्ये सांगितले आहे की, ‘मी आणि आमिर खान प्रॉडक्शनची संपूर्ण टीम हे जाहीर करत असताना खूपच उत्साहित आणि आनंदी आहोत.

Mission Raniganj: परिणीती अन् खिलाडीचा ‘मिशन रानीगंज’मधील पहिलं गाणं प्रदर्शित

तसेच राजकुमार संतोषी दिग्दर्शित आणि सनी पाजी अभिनीत आमचा आगामी सिनेमा ‘लाहोर 1947’ हा असणार आहे. या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये यावेळी सांगितले आहे. तसेच नुकतीच बातमी आली होती की, आमिर खान आणि सनी पाजी एक सिनेमा करत आहेत. हा सिनेमा 16 ते 19 ऑक्‍टोबरच्या दरम्यान त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. परंतु 3 ऑक्टोबर दिवशीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे सर्व चाहते खूपच आनंदित असल्याचे सध्या बघायला मिळत आहे.

Tags

follow us