Download App

Salman Khan : ‘जिवे मारण्याच्या धमकीनंतर’ भाईजानने उचलले मोठे पाऊल; थेट विदेशातून मागवली…

Salman Khan Bullet Proof Car : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) सतत धमक्या येत आहेत. (Bulletproof Suv) गेल्या काही दिवसांपासून सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा ईमेल आला होता. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमानची सुरक्षा वाढवली होती. सतत मिळणाऱ्या या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर सलमानने आता मोठे पाऊल उचले आहे. (Nissan Patrol Suv) सलमानने आपल्या सुरक्षिततेकरिता बुलेटप्रूफ निसान पेट्रोल एसयूव्ही कार खरेदी केली आहे.

या कारचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निसान पेट्रोल ही निसानने बनवलेली आतापर्यंतची सर्वात महागडी एसयूव्ही कार आहे. दक्षिण आशियाच्या बाजारात ही कार लोकप्रिय आहे. ही कार भारतात विकली जात नाही, यामुळे सलमान खानने ही कार आंतरराष्ट्रीय बाजारामधून खाजगीरीत्या आयात केली आहे. एसयूव्हीमध्ये ही सर्वात सुरक्षित कार असलयाचे समजले जाते.


काय आहे या नव्या कारचे वैशिष्ट्य?

सलमान खानने खरेदी केलेल्या निसान पेट्रोलमध्ये ५.६-लिटर व्ही ८ पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्हीचे इंजिन ७- स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स बरोबर जोडले आहे. या कारची बाजारात किंमत ८० लाख आहे. पण सलमान खानने आयात केलेली कार बुलेटप्रूफ आहे. यामुळे तिची किंमत करोडोंमध्ये असण्याची शक्यता आहे.

सलमानला सतत धमकीचा ईमेल

१८ मार्च रोजी सलमान खानला धमकीचा ई-मेल आला होता. रोहित गर्ग नावाच्या एका तरुणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई-मेल पाठवून ही धमकी देण्यात आली होती. या ई-मेलमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गेल्या काही दिवसाच्या मुलाखतीचा संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये बिश्नोईने दावा केला आहे की, सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे.

World Health Day : टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी ‘या’ सेलिब्रेटीचे जाणून घ्या सिक्रेट्स

सलमान खानला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सलमान खानच्या घराच्याबाहेरील सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यावर बुधवारी सलमान खानने गुंडांकडून मिळणाऱ्या धमक्यांवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

एका अवॉर्ड शोच्या कार्यक्रमात सलमान खानला विचारण्यात आले, तुम्ही संपूर्ण भारताचे भाईजान आहात. तुम्हाला मिळणाऱ्या धमक्यांचा तुम्ही कसा सामना करत आहात? या सवालावर सलमान खानने दिलेल्या उत्तराचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. सलमान म्हणाला, मी संपूर्ण भारताचे भाऊ नाही, मी काही जणांचा जीव आहे. मी भाईजान त्यांच्यासाठी आहे जे माझे भाऊ आहेत आणि ज्यांना मी बहिणी बनवू इच्छितो, अशी गमतीशीर प्रतिक्रिया सलमान खानने दिली होती.

Tags

follow us