Download App

Subhedar ची लक्षवेधी कामगिरी! पहिल्या आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, कमाईचा आकडा समोर

Subhedar Box Office Collection : शिवकालीन इतिहासातील अजरामर योद्धा असा ‘सुभेदार तानाजीराव मालुसरे’ यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा (Subhedar) ‘सुभेदार सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. (Box Office Collection) प्रदर्षितच्या अगोदर पासून चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत ‘सुभेदार’ने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्या विकेंडला या सिनेमाने ८.७४ कोटींचा गल्ला कमावला आहे.


‘सुभेदार’ या सिनेमाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशी १.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.६८ कोटी, तिसऱ्या दिवशी २.२२ कोटी, चौथ्या दिवशी ९० लाख, पाचव्या दिवशी ९५ लाख, सहाव्या दिवशी १.४ कोटी, सातव्या दिवशी ८० लाखांची जोरदार कमाई केली आहे. तसेच आतापर्यंत या सिनेमाने ८.७४ कोटींचा गल्ला कमावला आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’ पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्ट दिवशी रसिक दरबारी सादर केले आणि ३५० सिनेमागृहांतील १ हजारपेक्षा जास्त शोजमधून चाहत्यांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो सिनेमागृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड बघायला मिळाले आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर परदेशात देखील ‘सुभेदार’ सिनेमाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

पहिल्या वीकेंडला सिनेमाने ५ करोडहून जास्तीची विक्रमी कमाई केली आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात देखील ‘सुभेदार’ सिनेमाची बॅाक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड बघायला मिळेल, असा अंदाज लावला जात आहे.

Subhedar Review: गनिमा कावा करणाऱ्यांकडून आत्मविश्वास शिकवणारा ‘सुभेदार’

‘सुभेदार’ सिनेमामधील गाण्यांना देखील चाहत्यांच्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ‘आले मराठे’ या गाण्यावर सिनेमागृहांमध्ये रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत चाहते लहान-मोठे गट एकत्रितपणे सिनेमा बघायला गर्दी करत आहेत. सुभेदार सिनेमाने बॉक्स ऑफिसचा गड जोरदार दणक्यात सर केल्याचे बघायला मिळाले आहे.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’सिनेमाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन्स, मुळाक्षर प्रोडक्शन्स प्रा.लि, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन्स यांनी धुरा सांभाळली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ सिनेमाचे निर्माते आहेत.

Tags

follow us