Cannes Film Festival 2024: दरवर्षीप्रमाणे यंदाही फ्रान्समध्ये (France) 14 मे ते 25 मे दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival ) आयोजित करण्यात येणार आहे. (Cannes 2024) यावेळचा कान्स प्रत्येक भारतीयासाठी खूप खास असणार आहे. कारण 30 वर्षांनंतर एका भारतीय चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात आपले स्थान पटकावले आहे.
भारतीय चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात दाखल
पायल कपाडिया (Payal Kapadia )दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘ऑल वी इमेजिन इज लाइट’ आहे. पायल कपाडियाने देशाचा गौरव केला आहे, कारण तीन दशकांनंतर भारतीयांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे. 11 एप्रिल रोजी पॅरिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली होती.
यापूर्वी 1994 मध्ये शाजी एन करुण दिग्दर्शित ‘स्वाहम’ या भारतीय चित्रपटाला कान्समध्ये संधी मिळाली होती. मात्र, पायल कपाडियाच्या चित्रपटाची कान्ससाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पायल कपाडियाच्या ‘अ नाईट ऑफ नोइंग नथिंग’ या माहितीपटाने 2021 मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑइल डी’ओर (गोल्डन आय) पुरस्कार जिंकला होता.
BMCM: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील टायगरच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक करतायत भरभरुन कौतुक
चित्रपटाची कथा कशी आहे?
‘ऑल वी इमेजिन इज लाइट’ बद्दल बोलताना या चित्रपटात प्रभा नावाच्या एका नर्सची कथा दाखवण्यात आली आहे. जिला तिच्या पतीकडून अनेक वर्षांनी भेटवस्तू मिळते. प्रभाचे तिच्या पतीसोबत चांगले संबंध नाहीत आणि ती पतीपासून वेगळी राहते. अशा स्थितीत प्रभाला तिच्या पतीकडून खूप दिवसांनी मिळालेले गिफ्ट पाहून थोडी अस्वस्थ होते. एके दिवशी प्रभा आणि तिची रूममेट सहलीला जातात, जिथे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. गेल्या 77 वर्षांपासून सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सिनेमांचे प्रदर्शन होत आहे.