भारताची ताकद वाढणार! नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल विमाने खरेदी करणार, 63 हजार कोटींची डील

India will buy 26 Rafale Aircraft from France : भारताने (India) फ्रान्सकडून 26 राफेल सागरी लढाऊ विमाने (Rafale Aircraft) खरेदी करण्याच्या मेगा डीलला मान्यता दिली आहे. 63,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा हा सरकारी करार लवकरच स्वाक्षरी केला जाणार आहे. या करारांतर्गत, भारतीय नौदलाला (India Neavy) 22 सिंगल-सीटर आणि चार ट्विन-सीटर विमाने मिळतील. सरकारी सूत्रांचा हवाला देऊन एएनआय या वृत्तसंस्थेने हा दावा केलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक (rafale marine fighter aircraft) कॅबिनेट समितीकडून मंजुरी मिळाली. त्यानंतर फ्रान्सकडून 26 राफेल एम लढाऊ विमाने खरेदी करण्याचा प्रस्तावित करार या महिन्यात अंतिम होण्याची शक्यता आहे.
5 वेळा नसबंदी तरीही अडीच वर्षांत 25 वेळा बनली आई प्रकरण वाचून डोकं गरगरेल
विमानाची डिलिव्हरी 2029 च्या अखेरीस सुरू होईल. भारताला 2031 पर्यंत संपूर्ण विमानं मिळतील. ही रायफल-एम विमाने आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य सारख्या विमानवाहू जहाजांवरून चालवली जातील. दोन्ही नौदल जहाजे जुन्या झालेल्या मिग 29के लढाऊ विमानांसह त्यांचे काम करतात. 26 राफेल मरीन जेट विमानांच्या खरेदीबाबत दोन्ही देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू होती. 2016 मध्ये हवाई दलासाठी 36 विमाने खरेदी करताना भारताने ठेवलेल्या किमतीतच नौदलासाठी राफेल मरीनचा करार करायचा होता.
मंगेशकर रूग्णालयाच्या अडचणी वाढल्या, धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात डीन डॉ. केळकर दोषी
या कराराची माहिती पहिल्यांदा पंतप्रधान मोदींच्या 2023 च्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान समोर आली. यानंतर, संरक्षण मंत्रालयाने विनंती पत्र जारी केले होते. ते डिसेंबर 2023 मध्ये फ्रान्सने स्वीकारले. यापूर्वी सप्टेंबर 2016 मध्ये भारताने हवाई दलासाठी फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी केली होती. हा करार 59 हजार कोटी रुपयांना अंतिम झाला.
राफेल मरीन फायटर जेटची वैशिष्ट्ये
राफेल मरीन हे भारतात असलेल्या राफेल लढाऊ विमानांपेक्षा अधिक प्रगत आहे. त्याचे इंजिन अधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे हे लढाऊ विमान आयएनएस विक्रांतवरून स्की जंप करू शकते. ते खूप कमी जागेतही उतरू शकते. राफेलच्या दोन्ही प्रकारांमध्ये सुमारे 85 टक्के भाग सारखेच आहेत. याचा अर्थ असा की, सुटे भागांशी संबंधित कोणतीही कमतरता किंवा समस्या कधीही उद्भवणार नाहीत.