…अन्यथा एअरबेस अन् जहाज नष्ट करू; Israel Iran War दरम्यान इराणचा अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला इशारा

destroy the airbase and the ship Iran’s warning to America, Britain and France during the Israel-Iran War : इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला (Israel Iran War) आहे. शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा (Israel Attack) हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं. तुफान बॉम्बफेक करण्यात आली. या हल्ल्यांत संपूर्ण तेहरान हादरून गेले. या हल्ल्याला इराणने देखील उत्तर दिले. त्यामुळे जगामध्ये तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दरम्यान आता इराणने थेट इस्त्रायलची मदत करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांना धमकी दिली आहे.
इराणचा अमेरिका, ब्रिटन अन् फ्रान्सला इशारा
या इशाऱ्यामध्ये इराणने थेट म्हटले आहे की, जर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांनी जर इराणकडून केले जाणारे इस्त्रायलवरील हल्ले रोखल्यास त्यांचे या प्रदेशातील एअरबेस आणि जहाज नष्ट केली जातील. त्यानंतर ब्रिटनने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही इस्त्रायली हल्ल्यामध्ये देखील कोणतीही सैन्य मदत दिलेली नाही. तसेच आम्ही इराणचे इस्त्रायलवरील हल्ले रोखलेले नाहीत. तसेच जेव्हा नेतन्याहूंनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना कॉल केला तेव्हा त्यांनी त्यांना म्हटलं की, तुम्हाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. पण तुम्ही राजनैतिक मार्ग अवलंबला पाहिजे.
पंढरीच्या वारीसाठी येणाऱ्या ‘त्या’ 1109 दिंड्यांना मिळणार अनुदान; सरकारच्या आदेशात नेमकं काय?
या दरम्यान आता इस्त्रायल आणि इराण दोन्ही देश विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यामध्ये चीन आणि रशिया या दोन साम्यवादी राष्ट्रांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आता पर्यंत या युद्धामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. तर चीन आणि रशियाने ईराणच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रने देखील या पार्श्वभूमीवर संकटकालीन बैठक बोलावली आहे. त्यात अमेरिका हे इस्त्रायलचा प्रमुख मित्र आहे. त्यांचे मध्य पुर्वेत त्यांचे 40 हजार सैन्य आहे. जर इराणवर आणखी हल्ले झाले तर अमेरिका देखील यात उतरेल. दुसरीकडे चीन आणि रशिया हे दोन साम्यवादी राष्ट्र इराणचे मित्र आहेत. ते इराणला मदत करतील तर हे युद्ध मोठ्या स्तरावर जाऊ शकतं. तज्ज्ञांचम म्हणणं आहे की, जर 72 तास ही परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर महायुद्धाची शक्यता 30-40 टक्क्यांनी वाढेल.