Download App

बेस्ट सेलर ‘कास्ट मॅटर्स’चे लेखक Dr.Suraj Yengde आता हॉलिवूड गाजविणार !

  • Written By: Last Updated:

Dr.Suraj Yengde : कास्ट मॅटर्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व विचारवंत डॉ. सूरज मिलिंद एंगडे (Dr.Suraj Yengde) यांनी आता चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. हॉलिवूडमधील ओरिजिन चित्रपटामध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. इटलीतील व्हेनिस येथे जगतातील प्रतिष्ठित 80 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला आहे. यात ओरिजिन या चित्रपटाचा प्रीमियर शो दाखविण्यात आला आहे.

ओरिजिन (Origin) हा चित्रपट पुलित्झर विजेते पत्रकार इसाबेल विल्करसन यांच्या कास्ट: द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स या पुस्तकावर आधारित आहे. अवा डुव्हर्ने (Ava DuVernay) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच्या हॉलिवूडच्या स्क्रीनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दाखविण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे सह-कार्यकारी निर्माते डॉ.सूरज एंगडे, तर ते या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

‘ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी..,’; प्रकाश आंबेडकरांचा चिमटा

हा चित्रपट विल्करसनच्या स्वतःच्या आयुष्यातील वैयक्तिक शोकांतिका, नाझीचा काळ, दक्षिण अमेरिकेतील जीम क्रो कायदानुसार केलेले विभाजन, भारतातील दलित जातींनी भोगलेल्या अवहेला या चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची जगभर जोरदार चर्चा सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कोकणात दोन वाघ आमने-सामने : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन रामदास कदम-भास्कर जाधव भिडले

कोण आहेत सूरज एंगडे ?

डॉ. सूरज मिलिंद एंगडे हे भारतीय संशोधक, मानवाधिकार कार्यकर्ते, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते, वकील व लेखक आहेत. ते मूळचे नांदेडचे आहेत. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत. एंगडे हे आघाडीचे विचारवंत आणि जातव्यवस्थेचे प्रख्यात अभ्यासक आहेत. ते प्रसिद्ध पुस्तक ‘कास्ट मॅटर्स’चे लेखक आणि ‘द रॅडिकल इन आंबेडकर’चे सह-संपादक आहेत.

एंगडे यांनी जीवनात मोठा संघर्ष केला आहे. त्यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्या परिस्थितीही एगंडे यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात एलएलबी पूर्ण केले. त्यानंतर इंग्लंडमधील विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेत पीएचडी, तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून दुसरी पीएचडी केली आहे. रशियामध्येही त्यांनी शिक्षण घेतले आहे. राज्य सरकारची छत्रपती शाहू महाराज यांची शिष्यवृत्ती व वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या त्यांना मिळाल्या आहेत.त्यातून त्यांनी विदेशात शिक्षण घेतले आहे. सूरज हे कास्ट मॅटर्सचे लेखक आहेत. हे पुस्तक बेस्ट सेलरमध्ये आहे. या पुस्तकाचे पुस्तकाचे सात भाषांत अनुवाद झाले आहे.


https://youtu.be/CPe_x5dSNCA?si=QKPulhKW4bZ_JOmD

Tags

follow us