कोकणात दोन वाघ आमने-सामने : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन रामदास कदम-भास्कर जाधव भिडले

कोकणात दोन वाघ आमने-सामने : पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन रामदास कदम-भास्कर जाधव भिडले

शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. गतवेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गोळीबार मैदानावर सभा पार पडली होती, तेव्हा हे दोघेही आमने-सामने आले होते. एकमेकांना गाडून टाकण्याची भाषा या दोघांनी बोलून दाखविली होती. आता पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीवरुन हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. (Shivsena leader Ramdas Kadam and Bhaskar Jadhav clashed over the expulsion of office bearers)

भास्कर जाधव यांनी नुकतेच खेड मधील ठाकरे गटाचे तालुका प्रमुख चंद्रकांत चाळके आणि उपजिल्हाप्रमुख राजेंद्र आमरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. हे सर्व लोक चोरीचे आरोप असणारी, विविध गुन्हे दाखल असणारी आहेत. आपले पाप लपविण्यासाठी रामदास कदम यांच्या संपर्कात हे लोक होते, यामुळे पक्ष हितासाठी ही कारवाई केली, असं म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांसह रामदास कदम यांच्यावरही आरोप केले.

Maratha Reservation : मराठ्यांनो, छगन भुजबळला ताकद देऊ नका; जरांगे पाटलांनी साधला निशाणा

जाधव यांच्या या आरोपांना रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी समाचार घेतला. शिवसेनेत काम करताना चंद्रकांत चाळके असतील किंवा राजेंद्र आमरे असतील या लोकांनी शिवसेना वाढविण्याचे काम केले आहे. पहिल्यापासून या सर्वांनी रामदास भाईंची साथ दिलेली आहे. हे म्हणतात यांना निलंबित केलं, पण त्यापूर्वी दोन दिवस आधीच यांनी त्यांचे राजीनामे जिल्हाप्रमुखांकडे सुपुर्त केले होते.

Commercial LPG Cylinder : सणासुदीत महागाईचा मोठा झटका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ

आता राजीनामा दिल्यानंतरही निलंबित करण्याची नवी प्रथा भास्कर जाधल यांनी सुरु केली आहे का? शिवसेनेत प्रवेश केला आहे? असा सवाल करत योगेश कदम यांनी आमदार जाधव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले. भास्करराव जाधव यांनी चोर बोलू नये. कोरोना काळात तुमच्या नेत्यांनी एक कोव्हिड बॅग साडे सहाशे रुपयांना असताना ती साडे तीन ते चार हजार रुपयांना विकत घेतली. असे चोर नेते असताना तुम्ही त्यांना काय म्हणाल? मला वाटत दुसऱ्याकडे एक बोट दाखविताना स्वतःकडे चार बोट असतात. भास्कर जाधव हा कोकणाला लागलेला कलंक आहे, अशी एकेरी टीकाही त्यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube