Shah Rukh Khan Aaryan Khan : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआय बॉलिवूड स्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानआणि त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
समीर वानखेडे यांनी खासगी व्यक्तीमार्फत रोख रकमेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. आर्यन खानला अटक झाल्यावर २५ कोटींची मागणी करून ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर लावण्यात आला आहे. आता समीर वानखेडे यांनी कथित खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआय बॉलिवूड स्टार किंग खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे जबाब नोंदवले जाणार आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की, त्यांनी या प्रकरणातील बहुतेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत आणि खान पिता पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांची अधिक स्पष्टता आणि स्पष्ट चित्रे दिसून येणार आहेत. तसेच किंग खान आणि आर्यन खान यांना जबाबासाठी कधी बोलावले जाणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण सीबीआय त्यांना जबाबासाठी बोलवू शकते, असे सूत्रांनी सांगितले आहे.
Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा
समीर वानखेडे यांच्या विरोधामध्ये सीबीआयने अनेक आरोप केले आहेत. ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुटका व्हावी, यासाठी वानखेडे यांनी किंग खानकडे २५ कोटी रुपये मागितले होते. पण शेवटी १८ कोटी रुपयांत ही डील पक्की करण्यात आली होती, असे सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये सांगितले होते. तसेच वानखेडेंच्या वतीने किरण गोसावीने ५० लाख रुपयांचे आगाऊ पेमेंटही घेतलं असल्याचा आरोप सीबीआयने यावेळी केला आहे.