OMG 2: खिलाडीच्या ‘ओह माय गॉड 2’मधील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री?

OMG 2 Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडीला जवळपास ११ वर्षांनंतर ‘ओएमजी’ म्हणजेच ‘ओह माय गॉड २’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसापासून याची चांगलीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बस एक महीने […]

OMG 2 Akshay Kumar

OMG 2 Akshay Kumar

OMG 2 Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडीला जवळपास ११ वर्षांनंतर ‘ओएमजी’ म्हणजेच ‘ओह माय गॉड २’ (Oh My God 2) या सिनेमाचा सिक्वेल घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. हा सिनेमा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनत आहे. गेल्या काही दिवसापासून याची चांगलीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा रिव्ह्यू कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. आता सिनेमाचे सेन्सॉर प्रमाणपत्र आणि कट्सबद्दल काही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिव्ह्यू कमिटीने खिलाडी याचा हा सिनेमा बघितला आहे. या सिनेमाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, या निष्कर्षापर्यंत कमिटीने आढावा घेतला आहे. एवढेच नाही तर, सिनेमा बघितल्यानंतर समितीने सिनेमात २० कट्स करण्यास सांगितले असल्याचे देखील सांगितले जात आहे.

परंतु आतापर्यंत सीबीएफसीने या कट्सविषयी निर्मात्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस जारी केली नाही. यामध्ये या कट्सचे कारण देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खिलाडीचा हा सिनेमा ११ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापासून निर्मात्यांनी सिनेमातील एक गाणे देखील रिलीज करण्यात येणार होते. सिनेमातील हे गाणे चाहत्यांना चांगलेच आवडल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु आता सेन्सॉरकडून कट्सची विचारणा झाल्यामूळे अशा स्थितीत खिलाडीच्या सिनेमाची रिलीज तारीख पुढे ढकलली जाणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

अद्याप निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृतपणे काही समोर आले नसल्याचे दिसत आहे. खिलाडीसोबत या सिनेमात आणखी अनेक स्टार्स दिसून येणार आहे. पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम ही या सिनेमातील दोन मोठी नावे असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघे देखील या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ‘ओएमजी’च्या पहिल्या भागात परेश रावल हे होते. परंतु यामध्ये  त्यांची जागा पंकज त्रिपाठीने घेतली आहे. खिलाडीने‘ओएमजी’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. मात्र, ‘ओएमजी २’मध्ये तो भोलेनाथच्या भूमिकेमध्ये दिसला आहे. त्याच्या लूकची झलक टीझर आणि गाण्यात बघायला मिळाली आहे.

Exit mobile version