Download App

Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या’ द्या’मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार

Ankur Wadhave Upcoming Movie: झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) या लोकप्रिय कार्यक्रमाला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. (Upcoming Movie) त्यातीलच एक कलाकार म्हणजे अंकुर वाढवे. अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर अंकुरने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता अंकुश वाढवेने (Ankur Wadhave) एका नव्या रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत लवकरच बघायला मिळणार आहे.


‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता अंकुर वाढवे (Ankur Wadhave) हा घराघरांत पोहोचला आहे. एकीकडे हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या कार्यक्रमाचे चाहते देखील नाराज झाले आहेत. परंतु आता या कार्यक्रमातील छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवे आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावामध्ये लहानाचा मोठा झालेल्या अंकुर वाढवेने प्रायोगिक रंगभूमीच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात एक अनोखी छाप निर्माण केली आहे. पुढे एकांकिका, प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, सिरीयल आणि सिनेमांच्या माध्यमातून तो चाहत्यांचा मनोरंजन करू लागला. परंतु छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने त्याला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला.

परंतु आता आगामी सिनेमाच्या माध्यमातून तो रुपेरी पडद्यावर लवकरच बघायला मिळणार आहे. अंकुरने आजवर अनेक सिनेमांत काम केलं असलं तरी त्याच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमात अंकुर पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून अंकुरचे चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. परंतु अद्याप या सिनेमाचं नाव समोर आले नाही.

आपली मुख्य भूमिका असलेल्या सिनेमाबद्दल बोलत असताना अंकुर वाढवे म्हणाला की, मी याअगोदर केलेले सर्व सिनेमे विनोदी होते. परंतु आगामी सिनेमाचा हा थोडा वेगळा बघायला मिळणार आहे. हा सिनेमा सटायर पद्धतीचा आहे. मी याआधी अनोखी पात्र साकारली आहेत. परंतु हा सिनेमा खूपच वेगळा असणार आहे. माझी मुख्य भूमिका असल्याने माझ्यासाठी हा सिनेमा खूपच खास ठरणार आहे.

Mahesh Kale: ‘श्यामची आई’ चित्रपटातून महेश काळे करणार संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण

अंकुर पुढे म्हणाला की,”आगामी सिनेमाचं दिग्दर्शन रवींद्र शिवाजी यांनी केलं आहे. तर चैतन्य पिसाळने या सिनेमाची कथा लिहिली आहे. चैतन्यने मला ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये बघितलं आणि त्याला या सिनेमाची गोष्ट सुचली आहे. मी विनोदी अभिनेता आणि कलाकार आहे हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने मला डोळ्यासमोर ठेऊन या रंजक अशा सिनेमाची गोष्ट लिहिली आहे. माझ्यासारख्या कमी उंचीच्या एका विनोदी अभिनेत्याला मुख्य भूमिकेसाठी विचारणा होण्याची ही पहिलीच वेळ असणार अशी शक्यता आहे. अंकुर वाढवेसोबत त्याच्या आगामी सिनेमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सतीश नाईक आणि समीर खान या सिनेमाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us