Download App

VIDEO : ‘म्हणूनच… विकी सुपरस्टार’ छावाच्या लेखकांनी सांगितला तो खास अनुभव

  • Written By: Last Updated:

Chhaava Writer Omkar Mahajan Shares Experience : ‘छावा’ या चित्रपटाची (Chhaava Movie) सध्या सगळीकडे चर्चा रंगलीय. हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. दरम्यान, या चित्रपटाचे लेखक ओंकार महाजन यांनी (Omkar Mahajan) लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले अनुभव आणि चित्रपटाची (Chhaava) निर्मिती प्रक्रिया यावर भाष्य केलं.

यावेळी लेट्सअप मराठीसोबत बोलताना ओंकार महाजन म्हणाले की, मिळालेलं यश हे टीमवर्क आहे. ही सुरूवात आहे, बऱ्याच काही गोष्टी अजून आयुष्यात करायच्या आहेत. मैलाचे दगड पार करायची इच्छा आहे. लक्ष्मण उतेकर माझ्यासाठी बरंचकाही आहे. छावामध्ये ते मॅजिक आहे, ते सर पण आहेत आणि मोठा भाऊ पण आहेत. टपालपासून त्यांचं अन् माझं नातं विशेष झालंय. ते माझ्यामागील बॅकबोन आहेत, असं महाजन म्हणाले.

शेअर बाजारात पुन्हा घसरण, गुंतवणूकदारांचे बुडाले हजारो कोटी, ‘हे’ आहे कारण

एवढंच लक्षात होतं की, आपल्याला चिकाटीने काम करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत गेलो, त्याचंच फलित हळुहळू मिळतंय. कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला चांगला शिक्षक मिळाला तर त्याचे स्टुडंट आयुष्यात काही ना काही नक्कीच करू शकतात. अशाच प्रकारचं बोलणं जेव्हा पुन्हा पवार उतेकरांना भेटल्यानंतर झालं. तुझ्याकडे एक-दीड वर्ष आहे. नवीन काहीतरी संधी, चढता आलेख घे, असं उतेकर म्हणाले.

विकी कौशलसोबत या सिनेमा निमित्ताने पहिल्यांदा काम केलंय. विकीची पहिली सिंटिंग आठवतेय, विकीचे अक्षरश: डोळे भरून आले होते. त्याच्या भावना आम्हाला दिसलं. तो उठून उभा राहिला अन् हात जोडून म्हणाला ‘बस…अब मेरे सामने बोलने के लिए आपने कुछ रखा ही नहीं है!’ त्यानंतर त्याने उठून मी, लक्ष्मण सर आम्हा सगळ्यांना मिठ्या मारल्या. म्हणजे जे दोन-अडीच तास आम्ही ऐकत होतो, ते एक विश्व सरांनी उभं केलं होतं. ती फिलिंग अशी होती की, दहा मिनिटं आम्ही सगळे स्तब्ध होतो. कोणी काहीचं बोलत नव्हतं, अगदी विकी देखील. तर हा सगळ्यात पहिला अनुभव होता.

दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ‘एप्रिल मे 99’च्या पोस्टरचे अनावरण, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

नंतर जेव्हा जेव्हा आम्ही शुटवर गेलो, कारण 127 दिवस शुटिंग चाललं होतं. 50-60 दिवस आम्ही शुटच्या लोकेशनवर गेलो. जेव्हा जेव्हा आम्ही सेटवर गेलो, तेव्हा माणसाचं मॅजिक, तो स्टार आहे ना ते दिसून येतो. विकीचं कामाची चिकाटी, कामाबद्दलची आपुलकी, त्याची मेहनत आणि त्याचं सगळं वेळेत असणं. त्यामुळेच विकी आज सुपरस्टार आहे. म्हणूनच कदाचित तो आज या लेव्हलला आहे, असं चित्रपटाचे लेखक ओंकार महाजन यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us