Download App

Madhur Bhandarkar: ‘सर्किट’ सिनेमाचा धमाका होणार; निर्मात्यांनी सांगितले त्यामागील रहस्य

Madhur Bhandarkar : बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक म्हणून मधुर भांडारकर (Director Producer Madhur Bhandarkar) यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट देणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दिग्दर्शकाने मराठी चित्रपट केला आहे म्हणून नक्कीच त्याचे स्वागत केले जात आहे. मधुर भांडारकर यांच्या ‘सर्किट’ चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शन करणारे आकाश पेंढारकर हे चित्रपटाद्वारे मराठीत स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून सुरुवात करत आहेत.

दिग्गज चित्रपट निर्माते मधुर भंडारकर यांनी सांगितले की, फिनिक्स प्रॉडक्शनचे पराग मेहता यांनी त्यांना फोन करून बोलावून घेतलं, त्यांना बोलावून एक फिल्म दाखवण्यात आली, ती फिल्म पाहून ते काहीतरी वेगळंच पाहिलं असल्याचे यावेळी मधुर भंडारकर यांनी यावेळी सांगितलं. ‘सर्किट’ हा सिनेमा ‘लव्ह स्टोरीवर’ आधारित वैभव आणि ऋता या दोघांचे असल्याचे त्यांनी सांगितल. मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांनी दिलेल्या लेट्सअप च्या मुलाखतीत ‘सर्किट’ (Circuit) या सिनेमा सुपरहिट होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले त्यामध्ये त्यांचं रिलेशन आणि वैभवचा राग या सिनेमातून वेगळ्या थेलर आहे. या सिनेमातून समाजाला चांगला संदेश जाणार आहे. तसेच सर्किट सिनेमाचा महाराष्ट्रभर धमाका होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

जेव्हा हा सिनेमाचा थोडासा भाग मला दाखवण्यात आला तर एक सामान्य माणूस असल्यासारखा पाहिला होता. त्या सिनेमामधून मला काही अपेक्षा नव्हती. पण तो सिनेमा मला इतका आवडला की, मी बाहेर येऊन बसल्यावर हा सिनेमा तर खूपच कमाल झाली असल्याचा विचार मनात आला. परंतु पहिल्यांदा मराठी सिनेमात काहीतरी वेगळं पाहिल्याचे निर्माते मधुर भंडारकर यांनी यावेळी सांगितले.


वेबसिरीज असेल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म किंवा हिंदी सिनेमा बघितलं, परंतु या सिनेमात थिलर, ड्रामा आणि त्यांच्यामधून एक सोशल मेसेज होता, आणि चांगल्या प्रकारचा सोशल मेसेज जाणार आहे. यामुळे तो सर्किट हा सिनेमा मला खूप आवडला. आणि परागला सांगितले की एवढं टायलेन्ट परफॉर्म ऋताने केला आहे. त्याबरोबरच वैभव आणि मिलींद यांनी उत्तम प्रकारे भूमिका केली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मिलींद शिंदेची आतापर्यंत जेवढे चित्रपट आहेत. त्यामध्ये त्यांचा हा अतिशय धमाकेदार सिनेमा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आणि यावरून पराग यांनी हा सिनेमा कसा आहे, असा सवाल त्यांना केला.

यावर मधुर भंडारकर म्हणाले की, हा सिनेमा अतिशय रंजक बनवला गेला आहे, आणि आजून या सिनेमाला कोणत्या पद्धतीने वेगळं रूप देता येईल, मधुर भंडारांच्या सिनेमातून प्रत्येक वेळेस सिनेमातून काहींना काही सोशल मेसेज हा चाहत्यांना मिळत असते, तसेच त्यांनी २०२२ मध्ये बंगाली सिनेमा बनवलं असल्याचे देखील त्यांनी सांगितले, त्याला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Ek Number Super Making : कसं झालं ‘एक नंबर… सुपर’चं शुटींग पाहा व्हिडीओ…

परंतु कोणताही सिनेमा असू दे, त्या सिनेमाला अंतिम रेखा नसते. सिनेमा हा सिनेमा असतो. मग तो कोणताही असू दे हिंदी, बंगाली किंवा मराठी सिनेमा हा सिनेमाचं असतो, आणि सर्किट ही फिल्मही भंडारकर एंटरटेनमेंटने चाहत्यांच्या समोर आणणार यामध्ये चांगली टीम आहे, नवीन अभिनेते आहेत. आणि त्यांची जी काम करण्याची ऊर्जा होती, ती पॉजिटीव्ह होती. यामुळे याला पाठिंबा द्याला पाहिजे असल्याचे यावेळी ते म्हणाले.

Tags

follow us