Sharad Ponkshe: ‘कुणी टुकार तर कुणी…’; वादग्रस्त विधानानंतर राजकारण्यांनी शरद पोक्षेंना घेरलं

Sharad Ponkshe Statement: शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे मराठी मनोरंजन लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु अनेकवेळा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत येत असतात. यावेळी देखील ते त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र त्यांनी थेट कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि गांधी कुटुंबियांवरच जोरदार टीका त्यांनी यावेळी केली होती. राहूल गांधी […]

Sharad Ponkshe

Sharad Ponkshe

Sharad Ponkshe Statement: शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे मराठी मनोरंजन लोकप्रिय अभिनेते आहेत. परंतु अनेकवेळा ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत येत असतात. यावेळी देखील ते त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र त्यांनी थेट कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) आणि गांधी कुटुंबियांवरच जोरदार टीका त्यांनी यावेळी केली होती.

राहूल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी केली वादग्रस्त विधान केल्याचे आपण पहिले आहे. यावरून अनेकवेळा गोंधळ झाल्याचे आपण पाहिलं आहे . यावर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. यावर शरद पोंक्षे यांनी देखील जोरदार विरोध करत टीका केली आहे. थेट तुरूंगातून त्यांनी राहूल गांधी यांच्यावर टीका करणारा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यानंतर आता त्यांनी गांधी आडनावावरून एक वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे, जे चांगलच चर्चेत आल्याचे दिसत आहे. यावर आता कॉंग्रेसने देखील प्रत्युत्तर दिल्याचे बघायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात चांगलंच वातावरण तापल्याचे बघायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सध्या जोरदार सुरू आहे. त्यामध्ये आता या नव्या वादानं पुन्हा एकदा राजकीय मैदान पेटले आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या आडनावावरून वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे खरे गांधी नाही तर ते खान आहेत. त्यांच्या या विधानावरून राजकीय वातावरण जोरदार तापल्याचे दिसत आहे.

गांधी कुटुंबिंयांनी अॅफिडेव्हिट करून हे आडनावं बदललं आहे. सोबतच महात्मा गांधींचे वंशज हे नाहीत. गांधी आडनावाचा फायदा घेत त्यांनी हे आडनाव घेतलं आहे. ही फिरोज खान यांची पुढची पिल्लावळ आहे. हा इतिहास आहे, अशी वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले आहे. यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत शरद पोंक्षे याना चांगलेच झापल्याचे दिसत आहे. म्हणाले की “शरद पोंक्षे हा अभिनेता म्हणून टुकार तर आहेच. पण माणूस म्हणूनही नीच आहे”.

Sharad Ponkshe यांची राहुल गांधींवर तिखट शब्दात टीका; म्हणाला,”तू तर फिरोज खान…”

यावेळी शरद पोंक्षेंच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील जोरदार टिकला केली आहे की, ”हा विकृत पोंक्षे अजून काय बोलू शकतो…नथुरामची अवलाद…” सध्या त्यांच्या या ट्विटरवरून दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. स्वातंत्र्य दिन नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव येथे भारतीय विचार मंचच्या वतीनं शरद पोंक्षे यांचे सावरकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील या कार्यक्रमात होते. यावेळी फिरोज गांधी यांचे मुळ आडनावं हे खान असल्याचा दावा करत त्यांनी टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, राहुल गांधी हे सावरकरही नाहीत आणि गांधी देखील नाहीत. राहुल गांधी यांना आपल्या आजीचा इतिहास माहित नाही तर सावरकरांचा कसा माहित असणार”, अशीही खोचक टीका त्यांनी केल्याचे बघायला मिळाले होते.

Exit mobile version