Dada Kondke : आपल्या धमाल विनोदांनी आणि हटक्या अभिनयाने फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी सिनेमा सृष्टी देखील दणाणून सोडलेले अभिनेते म्हणजे दादा कोंडके. काल (८ ऑगस्ट) दादा कोंडके यांचा स्मृतिदिन होता. आज दादा कोंडके आपल्यामध्ये नसले तरी, त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून ते अजरामर ठरले आहेत. दादा कोंडके यांचा सिनेमा म्हटला की, चाहते आणि प्रेक्षक आज देखील तो आवर्जून पाहताना दिसत असतात. अवघ्या रसिकजनांना कायम हसवणाऱ्या दादा कोंडके यांनी अभिनेता असण्याबरोबरच कधीकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं. तसेच दादांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी आता झी टॉकीजने (Zee Talkies) प्रेक्षकांसाठी आणली आहे. विनोदसम्राट दादा कोंडके हे एक असं पर्व होतं ज्याने मराठी सिनेमाला मातीतल्या अस्सल विनोदीपटाचा परिसस्पर्श दिला.
६ ऑगस्ट पासून प्रत्येक रविवारी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता दादा कोंडके यांचे ज्युबिलीस्टार ६ चित्रपट झी टॉकीजवर आता पाहायला मिळणार आहेत. यामध्ये ६ ऑगस्ट ‘येऊं का घरात’, १३ ऑगस्ट ‘सासरचं धोतर’, २० ऑगस्ट ‘राम राम गंगाराम’, २७ ऑगस्ट ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ३ सप्टेंबर ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, १० सप्टेंबर ‘आली अंगावर’ या सिनेमाची मेजवानी आता पाहायला मिळणार आहे. ( दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता ). ८ ऑगस्ट १९३२ दिवशी मुंबईच्या लालबाग भागातील चाळीमध्ये दादा कोंडके यांचा जन्म झाला होता. त्याचे वडील गिरणी कामगार होते.
दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णाजी कोंडके असे होते. परंतु लहानपणापासून ते खोडकर होते. संपूर्ण चाळीमध्ये ते कायम ‘दादा’गिरी करत असायचे. यावरून त्यांना लहानपणापासून दादा हे नाव मिळाले होते. तेव्हापासून ते दादा कोंडके या नावाने ओळखले जायचे. घराची आर्थिक परिस्थिती डबघाईची असल्याने दादा कोंडके यांनी त्या काळी अपना बाजारमध्ये नोकरी केली होती. तसेच ते उरलेल्या वेळामध्ये एक बँडसाठी देखील काम केले आहेत. तसेच त्यांना नाटकांची खूप आवड निर्माण झाली होती. त्यांनी नाटकांमधून भूमिका करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते राजकारणामध्ये नव्याने एन्ट्री मारली होती. त्याकाळी बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची मैत्री देखील खूपच एकनिष्ठ होती.
मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या मंचावर… पहिल्या वहिल्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी सुनिधी एक्साईट
दादा कोंडके यांचा मराठी सिनेमा या मैत्रीला कारण ठरला होता. ‘सोंगाड्या’ या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी दादा कोंडके यांनी कोहिनूर थिएटर बूक करण्यात आले होते. परंतु त्याचवेळी ‘जॉनी मेरा नाम’ हा देव आनंदचा सिनेमा प्रदर्शित झाल्याने दादा कोंडके यांचा सिनेमा हटवून त्याला जागा देण्यात आली होती. मराठी सिनेमाची होणारी गळचेपी सहन न झाल्याने दादांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हे प्रकरण घातले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मराठी सिनेमासाठी आवाज उठवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी शेकडो शिवसैनिक थिएटरबाहेर जमून मोठ्या प्रमाणात निदर्शन करत होते. अखेर थिएटर मालकाला हार मानून, ‘सोंगाड्या’ हा मराठी सिमनेमा लावावा लागला होता.