Download App

Gautami Patil: गौतमी पाटीलचं लग्नाबाबत भाष्य; म्हणाली, ‘तुम्ही लग्नाला या आणि तिथेही…’

  • Written By: Last Updated:

Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) हे नाव सतत चर्चेत असल्याचे बघायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या लावणीचा वाद चांगलाच रंगतदार ठरत जात आहे. (Video Viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यानंतर महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र चर्चेतील नाव गौतमी पाटील हिचे ठरले आहे.


गेल्या काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये गौतमी पाटील ही तिच्या आयुष्यातील भावी जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केले होते. यानंतर आता गौतमीने लग्न कधी करणार यावर उत्तर दिले आहे. गौतमी पाटील हिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये लग्न कधी करणार या सवालावर मोठं गौप्यस्फोट केला आहे. या मुलाखतीमध्ये तिला तिच्यावर होणाऱ्या अनेक आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली आहे.

यावेळी गौतमीला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने लाजत उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलला होतात. अनेक तरुणांना तुम्ही लग्न कधी करणार आहात, हा प्रश्न पडला आहे? असे तिला विचारण्यात आले होते. यावर तिने अजून तरी मी लग्नाचा विचार केला नाही. पण जेव्हा लग्न ठरेल, तेव्हा मी तुम्हाला सर्वांना आवर्जुन सांगणार आहे. सर्वांना पत्रिका देखील देईन, असे तिने यावेळी सांगितले आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

याबरोबरच तिने “तुम्ही लग्नाला या आणि तिथेही गोंधळ घालून जा, असेही चाहत्यांना तिने यावेळी सांगितले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसापासून गौतमी पाटीलला लग्नावरुन बीडमध्ये राहणाऱ्या किसानपुत्र श्रीकांत गडालेंनी पत्र लिहिले होते. या पत्राद्वारे त्यांनी गौतमी पाटीलची चांगलीच कानउघडणी केली होती. तसेच तिने तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही, असं म्हणत त्यांनी गौतमीला टोला लगावला होता.

Tags

follow us