वाढदिवशी दीपिकाने दिली चाहत्यांना मोठी भेट! नव्या जनरेशनला पुढे आणण्यासाठी उचललं पाऊल

Deepika Padukon हिने आपल्या वाढदिवशी नवे आणि तरुण क्रिएटिव्ह टॅलेंट पुढे आणण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

Deepika Padukone: वयाच्या 38 व्या वर्षीही 'दीपिका' एकदम फिट; जाणून घ्या रहस्य

Deepika Padukone: वयाच्या 38 व्या वर्षीही 'दीपिका' एकदम फिट; जाणून घ्या रहस्य

Deepika Padukon A step taken to bring forward the new generation by The Onset Program : अभिनेत्री, दीपिका पदुकोण आपल्या अभिनयाबरोबर निर्माती आणि मानसिक आरोग्यासाठी देखील ओळखली जाते. दीपिका पदुकोण हिने आपल्या वाढदिवशी नवे आणि तरुण क्रिएटिव्ह टॅलेंट पुढे आणण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. खऱ्या कथांना आणि नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या विचारसरणीला पुढे नेत, दीपिकाने आज ‘द ऑनसेट प्रोग्राम’ची घोषणा केली. हा तिच्याक्रिएट विथ मीप्लॅटफॉर्मचा पुढचा टप्पा आहे. याचा उद्देश भारतीय फिल्म, टीव्ही आणि जाहिरात क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या नव्या कलाकारांना संधी देणे आहे, ज्यामुळे त्यांची कला पाहिली जाईल, ऐकली जाईल आणि योग्य प्रकारे प्लॅटफॉर्म मिळेल.

BMC निवडणुकीत ट्विस्ट, अमराठी मतदार गेम फिरवणार; सर्व्हेतील आकड्यांनी खळबळ

हा प्रोग्राम केवळ गुणवत्तापूर्ण आणि हुशार लोकांना शिकण्याच्या संधी देणार नाही, तर ज्यांच्याकडे स्वतःचे प्रोजेक्ट हाताळण्याचा अनुभव आणि कौशल्य आहे, त्यांनाही पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देईल. पहिल्या टप्प्यात लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा, लाईट, एडिटिंग, साउंड, आर्ट, कॉस्च्युम डिझाईन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा क्षेत्रांचा समावेश असेल. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत दीपिका म्हणाली,

‘क्रांतिज्योती’ची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट! पहिल्याच वीकेंडला 3.91 कोटींची बंपर कमाई

गेल्या एका वर्षापासून देशात आणि देशाबाहेर असलेल्या उत्तम क्रिएटिव्ह टॅलेंटला ओळख देणे, त्यांना पाहण्यास-ऐकण्यास आणि अनुभव देण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याबद्दल मी खूपच प्रामाणिकपणे विचार करत आहे. ‘द ऑनसेट प्रोग्राम’च्या लाँचची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे आणि पुढच्या पिढीच्या क्रिएटिव्ह टॅलेंटशी तुम्हा सर्वांना भेट करून देण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे.”

युतीचा धर्म फक्त भाजपानेचं पाळावा का? तुम्ही बोलू नका आम्ही बोलणार नाही; चव्हाणांचा अजित पवारांना सल्ला

भारत आणि परदेशातील क्रिएटिव्ह टॅलेंटला ओळख देण्याच्या आपल्या व्हिजनला पुढे नेत, दीपिका पदुकोणचा ‘द ऑनसेट प्रोग्रामआता https://onsetprogram.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल, जिथे लोक आपले काम पाठवू शकतात आणि इंडस्ट्रीतील सर्वोत्तम व्यक्तीं सोबत काम करण्याची संधी मिळवू शकतात. तिने या संदर्भातील व्हिडिओ आपल्य इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.

Exit mobile version