Deepika Padukone Pregnancy: अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ( Deepika Padukone) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीबाबत ( Deepika Padukone Pregnancy) चांगलीच चर्चा रंगली होती. दीपिका गरोदर असल्याची माहिती मिळत आहे. दीपिका– रणवीर लवकरच आई– बाबा होणार आहेत.
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. दीपिका-रणवीरच्या घरी आता लवकरच पाळणा हालणार आहे. दीपिका लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिच्या प्रेग्नेंसीबाबत गौप्यस्फोट केला. दीपिकाच्या गरोदरपणाची बातमी ऐकून चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. दीपिकाने पोस्टमध्ये सांगितले आहे की, ती सप्टेंबरमध्ये मुलाला जन्म देणार आहे.
पोस्ट शेअर करताना दीपिकाने हात जोडलेले आणि डोळ्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. तिने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की- सप्टेंबर 2024, दीपिका-रणवीर. तसेच, मुलांचे कपडे, शूज, फुगे या फोटोवर चित्रित केले आहेत. ते खूपचं गोंडस दिसत आहेत.
सेलिब्रिटींनी अभिनंदन केले: दीपिकाच्या प्रेग्नेंसीची बातमी कळताच सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वजण त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत. विक्रांत मेस्सीने लिहिले आहे की, ओएमजी… तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. तर क्रिती सॅननने लिहिले आहे की ओएमजी, तुम्हा दोघांचे अभिनंदन.आणि एका चाहत्याने लिहिले की खूपआनंद झाला, स्वतःची काळजी घ्या.अशा कॉमेंट्सचा वर्षाव सध्या होत आहे.