Download App

फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर दीपिका पादुकोणने सोडलं मौन; म्हणाली, “आम्ही ‘त्या’ दिवसाची…”

Deepika Padukone on Family Plannig: दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) हे चाहत्यांचे आवडते कपल आहे. दोघांची एकत्र केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या प्रेमाची सुरुवात 2012 मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ (Goliyon Ki Rasleela Ram-Leela) या चित्रपटाच्या सेटवर झाली. यानंतर 14-15 नोव्हेंबर 2018 रोजी दोघांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली आहेत आणि दोघेही फॅमिली प्लॅनिंग (Family Plannig) कधी सुरू करत आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यावर आता अभिनेत्री उघडपणे बोलली आहे. यासाठी ती खूपच उत्साहित झाल्याचे दिसत आहे.

एका दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपिका पादुकोण म्हणाली की, “रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आमच्या कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री कधी होणार याची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत. कुटुंबातील मंडळी मला भेटल्यानंतर माझ्यात काहीही बदल झाला नाही”, असं कायम सांगत असतात.

दीपिका पुढे म्हणाली की,”इंडस्ट्रीत पैसे आणि फेम मिळवलं असलं तरी आजही माझे पाय कायम जमिनीवरच राहणार आहेत. घरी मी सेलिब्रिटी नसते. माझे पाय जमिनीवर ठेवण्यात माझा कुटुंबियांचा खूप मोठा वाटा आहे. रणवीर आणि मी आमच्या मुलांवर देखील असेच संस्कार करणार असल्याचा विश्वास तिने यावेळी दाखवला आहे.

Nupur Shikhare: ना घोडा ना फेटा, जीमवेअरमध्ये लग्नाची वरात घेऊन आला आमिरचा जावई

दीपिका पदुकोणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी ही अभिनेत्री शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये दिसली होती. या अभिनेत्रीच्या भगव्या बिकिनीबाबत बरेच वाद झाले, मात्र हा चित्रपट हिट ठरला. यामध्ये तो अॅक्शन मोडमध्ये दिसली होती आणि तिची व्यक्तिरेखाही चाहत्यांना खूप आवडली होती. हा चित्रपट हिट ठरला होता. सध्या दीपिका ‘फायटर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये ती हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 26जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्रीची बोल्ड शैली पाहायला मिळाली, जी चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुरत झाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज