नव्या टॅलेंटसाठी दीपिका पदुकोणची खास पहल; ‘क्रिएट विथ मी – ऑनसेट प्रोग्राम’वर दिली अपडेट

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्या ‘'क्रिएट विद मी ऑनसेट प्रोग्राम’ साठी आलेल्या अर्जांचे परीक्षण करण्याचा अनुभव सांगितला.

Untitled Design (8)

Untitled Design (8)

Deepika Padukone’s special initiative for new talent : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या अभिनेत्री, निर्माती आणि मेंटल हेल्थ अॅडव्होकेट दीपिका पदुकोण यांनी मनोरंजन क्षेत्रातील पुढील पिढीतील क्रिएटिव्ह प्रोफेशनल्स घडवण्यासाठी सुरू केलेल्या आपल्या उपक्रमाबाबत एक नवा अपडेट शेअर केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी त्यांच्या ‘’क्रिएट विद मी ऑनसेट प्रोग्राम’ साठी आलेल्या मोठ्या संख्येतील अर्जांचे परीक्षण करण्याचा अनुभव सांगितला. गेल्या काही महिन्यांत हे काम खूप मेहनतीचे पण तितकेच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले:

“गेल्या तीन महिन्यांत खूप मेहनत झाली! अर्जांची गुणवत्ता पाहून मी आणि माझी टीम अक्षरशः आश्चर्यचकित झालो. त्यातून सर्वोत्तम टॅलेंट निवडणे ही मोठी जबाबदारी होती. तुमच्यापैकी अनेकांशी बोलण्याची आणि तुम्हाला जवळून जाणून घेण्याची संधी खूप छान होती…आमच्या ‘’क्रिएट विद मी – ऑनसेट प्रोग्राम’ च्या पहिल्या ग्रुप (Cohort) विषयी लवकरच माहिती देणार आहोत.

हा अपडेट दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘Onset Program’ ची घोषणा केल्यानंतर काही महिन्यांनी समोर आला आहे. उदयोन्मुख टॅलेंटला संधी देणे आणि मनोरंजन क्षेत्रात नवीन क्रिएटिव्ह लोकांसाठी दारे उघडणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम त्यांच्या ‘’क्रिएट विद मी या प्लॅटफॉर्मचा भाग असून, सहकार्याने काम करणे आणि खऱ्या कथांना प्रोत्साहन देणे यावर त्याचा भर आहे.

या ‘ऑनसेट प्रोग्राम’ च्या माध्यमातून फिल्म आणि टेलिव्हिजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रत्यक्ष काम शिकण्याची संधी दिली जाणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांना रायटिंग, दिग्दर्शन, कॅमेरा, लाइटिंग, एडिटिंग, साउंड डिझाईन, आर्ट डिझाईन, आर्ट डायरेक्शन, कॉस्च्युम डिझाईन, हेअर स्टायलिंग, मेकअप आणि प्रोडक्शन अशा अनेक विभागांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. हा उपक्रम सुरू करताना दीपिका पदुकोण यांनी सांगितले होते की, गेल्या वर्षी ‘क्रिएट विद मी’ ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर ही कल्पना त्यांच्या मनात आली.

इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम; राज्यात गॅस टंचाईची भीती, वितरकांना पोलीस संरक्षण

कथांना व्यासपीठ देणे आणि लेखक, दिग्दर्शक तसेच उदयोन्मुख निर्मात्यांसारख्या क्रिएटिव्ह व्यक्तींना पुढे आणणे हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपिकाच्या मते, ‘ऑनसेट प्रोग्राम’’ हा केवळ प्रशिक्षण देणारा प्लॅटफॉर्म नसून एक लॉन्चपॅड आहे. यात सहभागी होणाऱ्या तरुणांना प्रत्यक्ष सेटवर अनुभवी व्यावसायिकांसोबत काम करत प्रॅक्टिकल अनुभव मिळेल. तसेच ज्यांच्याकडे आधीपासून कौशल्य आहे, त्यांना भविष्यात स्वतःचे प्रोजेक्ट्स लीड करण्यासाठी सक्षम बनवणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या त्या पायाभरणीवर उभा आहे, जेव्हा दीपिका पदुकोण यांनी ‘Create With Deepika Padukone: Pitch Format’ च्या माध्यमातून लोकांना त्यांच्या आयडिया आणि कॉन्सेप्ट्स शेअर करण्याचे आमंत्रण दिले होते. आता प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या स्वरूपात ‘Onset Program’ या सहकार्याला आणखी एक पाऊल पुढे नेत आहे. यात नवोदित टेक्निशियन आणि क्रिएटिव्ह लोकांना इंडस्ट्रीतील अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक सेटवर काम करत शिकण्याची संधी मिळणार आहे.

काही महिन्यांच्या स्क्रीनिंग आणि उमेदवारांशी संवादानंतर आता अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. दीपिका पदुकोण यांनी सूचित केले आहे की या कार्यक्रमाच्या पहिल्या ग्रुपची (Cohort) घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्रातील नव्या टॅलेंटला घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Exit mobile version