Shah Rukh Khan : किंग खानला दिलासा; ‘या’ सिनेमातील लीक क्लिप्स हटवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Shah Rukh Khan Jawan Leaked Clips : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाने जगभरातील सर्वच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला. आता चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.   View this post on Instagram   A post shared by […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T162032.749

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan Jawan Leaked Clips : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटाने जगभरातील सर्वच बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला. आता चाहते त्याच्या आगामी ‘जवान’ (Jawan) या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यानंतर ‘जवान’ची निर्मिती करणाऱ्या रेड चिलीज एंटरटेनमेन्टने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. किंग खान आणि गौरी खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेन्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरअंतर्गत ‘जवान’ चित्रपटाची निर्मिती होत आहे.

आता टीवी प्लॅटफॉर्म, डायरेक्ट टू होम सेवा यांना कॉपीराइटचे उल्लंघन करण्यापासून रोखले आहे. रेड चिलीज एंटरटेनमेन्टने दाखल केलेल्या खटल्यावर न्यायमूर्ती हरी शंकर यांनी ‘जवान’ या चित्रपटातील लीक झालेले सीन काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. ‘जवान’ चित्रपटातील लीक झालेल्या क्लिपच्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व सोशल मीडियावरुन या क्लिप काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहे.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, युट्यूब, गुगल, ट्विटर आणि रेडित या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ‘जवान’ चित्रपटाच्या कॉपीराइट केलेल्या कंटेटचा प्रचार रोखण्यासाठी मोठं पाऊल उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

या व्हिडीओमध्ये शाहरुख अॅक्शन करत असल्याचे दिसून येत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओत तो नयनताराबरोबर दिसत होता. पण आता न्यायालयाच्या निर्णयामुळे शाहरुख खान आणि ‘जवान’ चित्रपटाच्या टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘जवान’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दाक्षिणात्य दिग्दर्शक एटलीने सांभाळली आहे.

या चित्रपटात किंग खानबरोबर नयनतारा आणि विजय सेतुपती देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकली असल्याची चर्चा आहे. या सिनेमामध्ये चाहत्यांना थलापती विजय आणि अल्लू अर्जुन या दाक्षिणात्य सुपरस्टार्सची झलक चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

Exit mobile version