Download App

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूने थेट पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत; म्हणाली…

Devoleena Bhattacharjee On PM Narendra Modi: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी म्हणजेच सर्वांची लाडकी गोपी बहू ही कायम सोशल मीडियावर अनेक गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करताना दिसते. आता देवोलिना भट्टाचार्जीने (Devolina Bhattacharjee) सोशल मीडियावर (social media) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे मदतीचे आवाहन केले आहे. अमेरिकेत आपल्या मित्राची हत्या करण्यात आली असून त्याचा मृतदेह आणण्यासाठी भारतीय दूतावासाने या प्रकरणात आवर्जून लक्ष घालावे, असे आवाहन अभिनेत्रीने पीएम मोदींना केले आहे.


देवोलीनाने सोशल मीडियावर लिहिले, “माझा मित्र अमरनाथ घोष याची मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेतील सेंट लुईस अकादमीजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याचे कुटुंब नव्हते आणि तो एकटाच होता. तीन वर्षांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले आणि वडिलांचे लहानपणीच निधन झाले. मात्र, अद्याप आरोपींचा उलगडा झालेला नाही. त्याच्या काही मित्रांशिवाय त्याच्या कुटुंबात कोणीही नाही. तो कोलकाता येथील रहिवासी आहे.

देवोलीनाने पुढे लिहिले, “तो एक उत्कृष्ट डान्सर होता, पीएच.डी. करत होतो. सायंकाळी ते फिरायला गेले असता अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. अमेरिकेतील काही मित्र मृतदेह आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अद्याप त्याबाबत काहीही अपडेट समोर आली नाही. भारतीय दूतावास, कृपया याकडे लक्ष द्या.” असे अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये पीएम मोदी, भारतीय दूतावास आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांना टॅग केले आहे.

देवोलीनाच्या पोस्टवर अनेक लोकांच्या कमेंट्स येत आहेत, कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, “तो आमच्या कुचीपुडी डान्स स्कूलमध्ये शिक्षक होता. आम्ही मृतदेहावर दावा करण्याचा आणि व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहोत.

Anant Radhika Pre Wedding : ‘व्हीआयपी’ मंडळींची वर्दळ अन् ‘जामनगर’ बनलं आंतरराष्ट्रीय विमानतळ

तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “हे धोकादायक आहे, मी ऐकलेली ही सहावी घटना आहे… अमेरिकेतही असेच धोकादायक गुन्हे घडत आहेत. तर आणखी एका यूजरने “येथे काय चालले आहे, तरुण भारतीय विद्यार्थ्यांना इतक्या क्रूरपणे का हत्या केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे.असा कॉमेंट्स सध्या होत असल्याचे दिसत आहे.

follow us